Latur ACB Trap | महसूल विभागाचा लिपीक लाच घेताना दुसऱ्यांदा अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – जामिनासाठी लागणारे सॉल्व्हन्सी Solvency (ऐपतदारी प्रमाणपत्र) काढून देण्यासाठी उदगीर तहसिल कार्यालयातील (Udgir Tehsil Office) महसूल लिपिकाला (Revenue Clerk) दोन हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Latur ACB Trap) सापळा रचून अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि.11) महसूल विभागाच्या कार्यालयात करण्यात आली. प्रशांत अंबादासराव चव्हाण Prashant Ambadarao Chavan (वय-48) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या महसूल सहायकाचे (लिपिक) नाव आहे. विशेष म्हणजे प्रशांत चव्हाण यांच्यावर 2016 साली लातूर एसीबीने (Latur ACB Trap) कारवाई केली होती. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून चव्हाण याला दुसऱ्यांदा लाच घेताना पकडल्याने खळबळ उडाली आहे.

 

याबाबत 28 वर्षाच्या तक्रारदाराने लातूर एसीबीकडे (Latur ACB Trap) गुरुवारी (दि.10) तक्रार केली. तक्रारदार यांचे भाऊजीवर गुन्हा (FIR) दाखल आहे. या गुन्ह्यात तक्रारदारांचे भाऊजीच्या जामीना करीता सॉल्व्हन्सी लागणार होती. भाऊजींच्या वडीलांच्या नावे सॉल्व्हन्सी काढण्यासाठी तक्रारदार यांनी प्रशांत चव्हाण यांच्याकडे अर्ज केला होता. चव्हाण यांनी सॉल्व्हन्सी काढून देण्याच्या कामासाठी दोन हजार रुपये लाचेची मागणी (Demanding a Bribe) केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी लातुर एसीबीकडे तक्रार केली.

 

लातुर एसीबीच्या युनिटने पंचासमक्ष पडताळणी केली असता लिपिक प्रशांत चव्हाण याने दोन हजार रुपेय लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार शुक्रवारी उदगीर तहसिल कार्य़ालायातील महसूल विभागात सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये लाच घेताना प्रशांत चव्हाण यांना ताब्यात घेण्यात आले. याबाबत उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन (Udgir Rural Police Station) येथे गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक परिक्षेत्राचे (Nanded ACB) पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे (SP Dr. Rajkumar Shinde),
अपर पोलीस अधिक्षक धरमसिंग चव्हाण (Addl SP Dharamsingh Chavan), लातूर एसीबीचे पोलीस उप अधीक्षक पंडीत रेजितवाड (DySP Pandit Rejitwad)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली (Police Inspector Bhaskar Pulli),
पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर (Police Inspector Anwar Mujawar) यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Latur ACB Trap | Revenue department clerk caught in anti-corruption net for second time while accepting bribe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule | जितेंद्र आव्हाड यांना झालेल्या अटकेचा मला अभिमान आहे – सुप्रिया सुळे

Pune Crime | नविन मिटर घेऊन देण्याच्या बहाण्याने फसवणूक, काही तासातच आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Nanded Crime | नंदिग्राम एक्सप्रेससमोर उडी घेत प्रेमीयुगुलाची आत्महत्या, भोकर रेल्वे स्थानकाजवळील घटना