Latur Accident News | सोयरीकीसाठी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, 4 जणांचा मृत्यू; लातूर जिल्ह्यातील घटना

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – Latur Accident News | मुलीच्या लग्नाची तारीख ठरवण्यासाठी जाणाऱ्या कुटुंबाच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात कुटुंबातील चार जणांचा मृत्यू (Death) झाला तर एका सहा वर्षाच्या मुलासह दोन जण गंभीर जखमी (Injured) झाले आहेत. ही दुर्दैवी घटना निलंगा ते औराद महामार्गावर (Nilanga to Aurad highway) अनसरवाडा पाटीजवळ घडली. भरधाव वेगात जाणारी इनोव्हा गाडीच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात (Latur Accident News) झाल्याची माहिती मिळत आहे.

भरधाव वेगात जाणाऱ्या इनोव्हा कार (Innova Car) चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार पलटी झाली.
हा अपघात इतका भीषण होता की कारने चारवेळा पलटी घेऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन पलटी झाली. अपघातातील लोक हे चाकूर येथील रहिवासी आहेत. मुलीच्या सोयरीकीच्या कामासाठी औरादकडे जात होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात भगवान मारोती सावळे, विजयमाला भाऊराव सावळे, लता भगवान सावळे,
राजकुमार सुधाकर सावळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर एका सहा वर्षाच्या मुलासह दोन जण गंभीर जखमी
झाले आहेत. अचानक काळाने घाला घातल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला.
मुलीच्या लग्नाची तारीख ठरवण्यासाठी जात असताना वाटेतच काळाने घाला घातला.

Web Title :- Latur Accident News | latur nilanga to aurad road accident news four dead two injured

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Chief Sharad Pawar | शरद पवारांना कधी ‘फ्रेंच कट’ दाढीत पाहिलं का?, सुप्रिया सुळेंनी शेअर केला दुर्मिळ फोटो

Ajit Pawar On Shinde Fadnavis Govt | विकासाच्या ऐवजी राज्यातल्या गुन्ह्यांचा वेग डबल; सत्ता टिकविण्यासाठी डबल इंजिन सरकारची तडजोड सुरु – अजित पवार