खळबळजनक ! उदगीरमधून 3 अल्पवयीन मुलं गायब

उदगीरः पोलीसनामा ऑनलाईन – शहरातून 3 अल्पवयीन मुले गुरुवारी (दि. 25) दुपारी अचानक गायब झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिस मुलांचा शोध घेत आहेत.

सुनील अंकुश चव्हाण (वय 12) , सचिन विक्रम चव्हाण (वय- 13), दर्शन लक्ष्मण डांगे (वय- 15) अशी बेपत्ता झालेल्या मुलांची नावे आहेत. या प्रकरणी अंकुश व्‍यंकटराव चव्‍हाण यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील नगरपालिकेसमोरील पदपथावर पाल मारून राहणा-या घिसाडी समाजाची तीन अल्पवयीन मुले गुरुवारी दुपारपासून गायब झाली आहे. पालकांनी दिवसभर त्यांचा शोध घेतला. मात्र ते सापडले नसल्याने अखेर पालकांनी रात्री मुले बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस मुलांचा शोध घेत आहेत.