मॉर्निंग वॉकला गेलेले शिक्षक दाम्पत्य वाहनाच्या धडकेत ठार

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिक्षक दाम्पत्याला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शिरूर मुखेड रोडवर शिरूर ताजबंद येथे घडली.

श्रावण रामराव सोमवंशी आणि त्यांची पत्नी प्रतिभाताई सोमवंशी अशी दोघांची नावे आहेत.

सोमवंशी दाम्पत्य वळसंगी येथे जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होते. ते नेहमीप्रमाणे आज सकाळी घराबाहेर फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी शिरूर ताजबंद पासून काही अंतरावर गेल्यावर शिरूर मुखेड रस्त्यावर त्यंना एका अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत प्रतिभाताई सोमवंशी यांचा जागीच मृत्यू झाला. तर श्रावण सोमवंशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like