Advt.

Latur Crime | धक्कादायक ! भावजयीशी फोनवर बोलतो म्हणून तरुणाला जिवंत जाळलं; महिन्यानंतर उकललं गूढ

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – लातूर तालुक्यातील (Latur Crime) भोईसमुद्रा येथील एका शेतातील आखाड्यात तरुणाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह (Dead Body Burnt Condition) आढळून आला होता. तब्बल एका महिन्यानंतर या गुन्ह्याची उकल करण्यात (Mystery Revealed) लातूर पोलिसांना यश मिळाले आहे. याप्रकरणी दोघांना अटक (Arrest) करण्यात (Latur Crime) आली आहे. ऋषिकेश रामकिशन पवार Rishikesh Ramkishan Pawar (वय -29) असं खून झालेल्या तरुणांच नाव आहे. तर रणजीत विजयकुमार देशमुख आणि चुलत भाऊ गोविंद नागोराव पवार अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ऋषीकेश, त्याचा मेहुणा रणजित देशमुख (Ranjit Deshmukh) आणि चुलत भाऊ गोविंद पवार (Cousin Govind Pawar) यांच्यासोबत 19 डिसेंबरला शेतातील आखाड्यात दारू पार्टी केली होती.
दारुच्या नशेत असलेला चुलत भाऊ आणि मेहुण्याने मृत ऋषीकेशला ‘तू आमच्या भावजयीशी फोनवर का बोलत असतो?’ अशी विचारणा केली.
यावरून तिघांमध्ये वाद झाला. त्यातूनच गोविंद पवारने ऋषीकेशच्या डोक्यात शेतातील अवजाराने वार केले त्यामध्ये ऋषीकेश बेशुद्ध पडला.
त्यानंतर गोविंद पवार आणि रणजित देशमुख यांनी ऋषीकेशला खाटेवर टाकले आणि पेट्रोल ओतून पेटवून दिले. (Latur Crime)

हि घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.
ऋषिकेश सोबत नक्की काय घडलं याच गूढ उकललं नव्हतं.
या गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिसांनी महिनाभर गोपनीय माहिती, मोबाइल चॅटींग (Mobile chatting), सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल लोकेशन (Mobile Location), कॉल डिटेल्सच्या आधारे आरोपींचा शोध लावला.
दोघांना अटक केल्यानंतर ऋषीकेशच्या खुनाची दोघांनीही कबुली दिली आहे.

 

Web Title :- Latur Crime | 29 years old man murdered by set him on fire alive in latur 2 arrested

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा