Latur Crime | नवविवाहितेला मनोरुग्ण ठरवून छळ करणार्‍या पुण्यातील सासरकडील ८ जणांवर FIR

लातूर : Latur Crime | माहेरहून कार घेण्यासाठी ५ लाख रुपये घेऊन न आल्याने नवविवाहितेला मारहाण (Beating) करुन मनोरुग्ण ठरवुन तिला घरातून हाकलवुन देण्याचा प्रकार पुण्यातील लोणीकंद (Lonikand, Pune) येथे घडला आहे. विवाहानंतर केवळ ८ महिन्यात ही घटना घडली आहे. विवाहितेच्या तक्रारीवरुन मुरुड पोलिसांनी (Murud Police) पुण्यात लोणीकंद गावातील सासरच्या ८ जणांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार (Domestic Violence) प्रकरणी गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Latur Crime)

पती स्वप्नील नवनाथ कंद (Swapnil Navnath Kand), संगीता नवनाथ कंद (Sangeeta Navnath Kand), नवनाथ वामन कंद (Navnath Vaman Kand), वनिता भारत खोंडे (Vanita Bharat Khonde), शिवाजी नामदेव कंद (Shivaji Namdev Kand), मिना नामदेव कंद Mina Namdev Kand (सर्व रा. लोणीकंद, ता. हवेली, जि. पुणे) यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी वैष्णवी स्वप्नील कंद Vaishnavi Swapnil Kand (रा. सारसा) यांनी मुरुड पोलीस ठाण्यात (Murud Police Station) फिर्याद दिली आहे. (Latur Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर तालुक्यातील सारसा येथील वैष्णवी बालाजी भिसे
(Vaishnavi Balaji Bhise) यांचा पुण्यातील लोणीकंदमधील स्वप्नील नवनाथ कंद
यांच्याशी फेब्रुवारी २०२२ मध्ये विवाह झाला. लग्नानंतर एक महिन्यानंतर तिला त्रास देणे सुरु झाले.
आपल्याला कार घ्यायची आहे, तुझ्या वडिलांकडून ५ लाख रुपये घेऊन ये, तुझा बाप भिकारी आहे का,
तुला आम्ही फुकट सांभाळायचे का असे म्हणून तिला छळ सुरु झाला. पैसे घेऊन ये, नाही तर तू घरात रहायचे नाही,
म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. उपाशी ठेवून अपमानास्पद वागणुक देणे सुरु केले.
पतीसह सासरच्या मंडळींनी एका कोर्‍या बाँडवर सही कर म्हणून दमदाटी केली.
तिने सही करायला नकार दिल्यावर तिला तु मनोरुग्ण आहे, असे म्हणून घराबाहेर हाकलून दिले.
त्यानंतर वैष्णवी हिने माहेरी आल्यावर पोलिसांकडे तक्रार केली.

Web Title :- Latur Crime | FIR against 8 in-laws in Pune for torturing the newly wed as a psychopath

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Mumbai Accident News | वरळी सी लिंकवर भीषण अपघात, ५ जण जागीच ठार, १० जखमी

Jalgaon ACB Trap | तक्रार अर्जावर कारवाई करण्यासाठी 4 हजार रुपये लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्यासह खासगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात