Latur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव शिवारात गोळीबार

उदगीर : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – जमीनीच्या वादातून (land dispute) लातूर (Latur Crime) जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील नागलगाव शिवारात गोळीबार (firing) झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (रविवार) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली आहे. यामध्ये एकाची प्रकृती गंभीर असून त्याला लातूर (Latur Crime) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे नागलगावमध्ये खळबळ उडाली आहे.

उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन (Udgir Sub-Divisional Police Officer Daniel Benn) यांनी सांगितले, तालुक्यातील नागलगाव येथील शिवाजी ज्ञानोबा पाटील (Shivaji Patil) आणि रमेश गणपती गुडसुरे (Ramesh Gudsure) यांचे शेजारी राहतात. त्यांच्यात मागील काही दिवसांपासून जमीनीचा वाद सुरु आहे. आज सायंकाळी पाचच्या सुमारास शिवाजी पाटील याने याच वादातून रमेश गुडसुरे आणि त्यांचा भाऊ सतीश गुडसुरे यांच्यावर स्वत:च्या जवळील पिस्तूलातून गोळी झाडली.

यामध्ये रमेश यांना गोळी लागली आहे. त्यांना तातडीने उदगीरच्या शासकीय रुग्णालयात (government hospital) दाखल करण्यात आले.
याठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी लातुर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
सध्या गावामध्ये शांततेचे वातावरण आहे. गावात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करण्याचे काम सुरु आहे.

Web Tital : Latur Crime | firing nagalgaon over land dispute one serious

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6,479 नवीन रुग्ण, तर 4,110 जणांना डिस्चार्ज

PIB Fact Check | अर्थ मंत्रालय तुम्हाला सुद्धा देईल दरमहिना 1.30 लाख रुपये कॅश? जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण

PM Modi | पीएम मोदी सोमवारी लाँच करतील e-RUPI, जाणून घ्या काय आहे ई-रुपी, कसे करते काम आणि काय होईल फायदा

Uddhav Thackeray | धमकी देऊ नका… एकच थापड देऊ, पुन्हा उठणार नाही, उद्धव ठाकरेंचा इशारा (व्हिडिओ)