Latur Crime | लातूर जिल्ह्यातील जळकोट येथे 3 मुलांचा बंधाऱ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू, मृतांमध्ये 2 सख्ख्या भावांचा समावेश

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – Latur Crime | लग्न समारंभासाठी (Wedding Ceremony) आलेल्या तीन मुलांचा कोल्हापुरी बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून (Drowning) दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा (Brothers) समावेश आहे. ही दुर्दैवी घटना लातूर जिल्ह्यातील (Latur Crime) लाळी खुर्द (ता.जळकोट) येथे शुक्रवारी (दि.27) सकाळी घडली. एकनाथ हणमंत तेलंगे Eknath Hanmant Telange (वय – 15 रा. उदगीर), चिमा बंडू तेलंगे Chima Bandu Telange (वय – 15), संगमेश्वर बंडू तेलंगे Sangameshwar Bandu Telange (वय – 13 दोघे रा. चिमेगाव जि. बिदर) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. शोकाच्या सावटाखाली हा विवाह सोहळा पार पडला.

 

लाळी खूर्द येथील तुळशीराम तेलंगे यांच्या मुलीचा विवाह सोहळा आज गावातच आयोजित केला होता. घरी पाहुणे आल्याने आंघोळीसाठी म्हणून बाहेरगावाहून आलेले पाहुणे मंडळीतील काही मुले लाळी खूर्द येथे नदीवर असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यावर गेली होती. दोन मुले पाण्यात उतरली. त्याचवेळी त्यांनी अन्य एका मुलाला पाण्यात येण्यास सांगितले. ज्याला पोहता येत नव्हते त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात तिघेही पाण्यात बुडाले. त्या मुलांसोबत असलेल्या इतर मुलांनी याबाबत गावात जाऊन सांगितले. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी बंधाऱ्याकडे धाव घेतली.

आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) पथकाने घटनास्थळी येऊन तीन मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले.
त्यानंतर हे मृतदेह जळकोट येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिले.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी बालाजी लंजिले (Sub-Divisional Police Officer Balaji Lanjile),
जळकोट पोलीस ठाण्याचे (Jalkot Police Station) पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम (Police Inspector Parmeshwar Kadam),
वाढोणा (बु) चे सहायक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण (API Naushad Pathan),
पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश मिटकरी यांनी घटनास्थळी येऊन पुढील कार्यवाही केली.

 

Web Title :- Latur Crime | latur tragic end of three children after drowning

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा