Latur Crime News | अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या; लातूर पोलिसांची मोठी कामगिरी

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – Latur Crime News | बेकायदेशीर वाळू उत्खनन करणाऱ्यांवर लातूर पोलिसांनी (Latur Police) मोठी कारवाई केली असून तब्बल नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लातूर पोलिस ठाण्याच्या जळकोट हद्दीच्या येथील डोंगरगाव आणि बोरगाव येथील तिरू नदी पात्रात काहीजण बेकायदेशीकरीच्या वाळू उत्खनन करून गौण खजिन्याची चोरी करत असताना पोलिसांनी सापळा लावून छापा मारला आणि नऊ जणांविरोधात कारवाईचा बडगा उचलला. या कारवाई दरम्यान २ जेसीबी, २ ट्रॅक्टरसहित ३४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना यावेळी हस्तगत केला. वाळूमाफियांवर केलेल्या या कारवाईनंतर त्यांच्यावर कायमस्वरूपी चाप बसवण्यासाठी पोलिस नेमकं काय करणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. (Latur Crime News)

 

मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येथील रहिवासी जीवन किशन केंद्रे (वय ४५ वर्षे) हा तीरू नदीच्या पात्रातून ट्रॅक्टरच्या मदतीने नदीपात्रातील गौण खनिज वाळूचे उत्खनन करत असल्याचे आढळून आले. कोणताही परवाना नसताना केवळ आर्थिक फायद्यासाठी केंद्रे वाळूची चोरी करत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करत चोरलेली वाळू, वाहतूकीचे वाहन आणि ५ लाख ५ हजाराच्या मुद्देमालासह अटक केली आहे. यावेळी कलम ३७९, ३४ भारतीय दंड विधान संहिता सह ४८ (७) (८) गौण खनिज कायदा २०१३ या अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. (Latur Crime News)

 

दरम्यान, रात्री तीनच्या सुमारास डोंगरगाव शिवाराजवळीत तीरू नदीपात्रातील वाळूचा बेकायदेशीर रीत्या उपसा केल्याप्रकरणी संदिप माधव चव्हाण (सुल्लाळी तांडा), तुकाराम देविदास लुंगारे (मरशिवणी), दीपक रोहिदास करडे (डोंगरगाव), सेवालाल बाबूराव जाधव (चिमेगाव), दीपक दामोदर परगे (घोणशी), दामोदर निवृत्ती परगे (घोणशी) जयप्रकाश माधव मोरे (जाम), माधव देश चव्हाण (सुल्लाळी तांडा), यांच्या विरोधात कारवाई करत पोलिसांनी सगळ्यांवर जळकोच पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

या कारवाईत पोलिसांनी दोन जेसीबी, एक ट्रॅक्टर, नदीपात्रातील चोरलेली वाळू आणि २९ लाख ५०० रुपयांचा
मुद्देमाल जप्त केला आहे. या सगळ्यांवर सुद्दा कलम ३७९, ३४ भारतीय दंड विधान संहिता सह ४८ (७) (८)
गौण खनिज कायदा २०१३ या अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

 

Web Title :- Latur Crime News | cases filed against 9 people for illegal sand mining in latur police crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Thane Measles Update | मुंबईपाठोपाठ ठाणेसुद्धा ‘गोवर’च्या विळखेत; मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्यात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू

Pravin Darekar | 123 कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबै बँकेचे अध्यक्ष भाजप आमदार प्रवीण दरेकरांना आरोपपत्रातून वगळले

Sanjay Raut | ‘शिवसेना सोडली आणि हेमंत गोडसे यांची कारकीर्द संपली, त्यांनी स्वत:च स्वत:ची कबर खोदली’ – संजय राऊत