×
Homeक्राईम स्टोरीधक्कादायक ! गळा आवळून 75 वर्षीय सासूचा खून, सुन अन् नातु 'गोत्यात';...

धक्कादायक ! गळा आवळून 75 वर्षीय सासूचा खून, सुन अन् नातु ‘गोत्यात’; लातूर जिल्ह्यातील घटना

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – गैरकृत्य करण्याला विरोध करणाऱ्या सासूला जिवाला मुकाव लागले आहे. आईसमान असलेल्या सासूचा सूनेने चक्क गळा आवळून खून (murder) केला आहे. लातूर जिल्ह्यातील उमरगा हाडगा (ता. निलंगा) येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. सुनेन अन् नातवाने गळा आवळून ही हत्या murder केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी निलंगा पोलिसांनी सून आणि नातवाला अटक केली आहे.

रुक्मिणबाई राजाराम माने (वय 75, रा. उमरगा हाडगा) असे खून murder झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी ललिता शिवाजी माने आणि गणेश शिवाजी माने असे अटक केलेल्या सून अन् नातवाचे नाव आहे.

निलंगा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुक्मिणबाई माने यांचा दोन दिवसापूर्वी मृत्यू झाला आहे. रुक्मिणबाई यांचा मुलगा शिवाजी याला आपल्या आईचा मृत्यूबद्दल संशय आला. यावेळी त्यांना आपली पत्नी ललिता आणि मुलगा गणेश यांच्यावर संशय होता. शिवाजी हा शासकीय नोकरीला आहे. मात्र पत्नी ही त्याच्यापासून घटस्फोट घेऊन बाजूलाच राहते. मात्र शिवाजी आपल्या आईबरोबर राहत होता. शिवाजी आपल्या पत्नीला पोटगी देतो. मात्र पोटगी मिळत असतानाही पत्नी ललिताने घरावर कब्जा केला होता. शिवाजी दिवसभर कामावर असायचा. त्यावेळी पत्नी ललिता गैरकृत्य करायची आणि याच गैरकृत्यांना सासू रुक्मिणबाई विरोध करत होत्या. याच विरोधाचा राग मनात ठेवून ललिताने आपला मुलगा गणेशला हाताशी धरून रुक्मिणबाई यांचा गळा आवळून खून murder केला.

सकाळी रुक्मिणबाई मृतवस्थेत घरात सापडल्या. रात्री व्यवस्थित असणारी आपल्या आईला काय झाल, असा प्रश्न शिवाजीला पडला. आपल्या आईचा खून झाल्याचा संशय शिवाजीला आला. त्याने तात्काळ निलंगा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये अनैसर्गिक मृत्यू असल्याचे निष्पन्न झाले. मुलाच्या संशयामुळे पोलिसांनी शिवाजीची पत्नी ललिता आणि मुलगा गणेश यांना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी केली असता दोघांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. निलंगा पोलीस तपास करत आहेत.

Also Read This : 

Pune News : तळेगाव ढमढेरे येथे दिवसाढवळ्या खून, प्रचंड खळबळ

घरबसल्या ‘ओम’च्या जापाबरोबरच करा हा व्यायाम, फुफ्फुसांमध्ये येईल मजबुती; जाणून घ्या

भाजप कार्यालयाजवळ 51 क्रुड बॉम्ब आढळल्याने खळबळ !

केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात, तर कोरोना संक्रमणापासून दूर रहा; जाणून घ्या कारण?

प्रियकराने सैन्यात भरती होताच दिला धोका, लग्नाला नकार देताच तरुणीने काढली ‘वरात’

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News