Latur Crime News | माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या चुलत भावाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – Latur Crime News | माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर (Former Union Home Minister Shivraj Patil Chakurkar) यांचे चुलत बंधू चंद्रशेखर उर्फ हणमंतराव पाटील चाकूरकर Chandrasekhar alias Hanmantrao Patil Chakurkar (वय-80) यांनी रविवारी (दि.5) सकाळी स्वत:वर गोळी झाडून (Shooting Himself) आत्महत्या (Suicide) केली. या घटनेमुळे लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चंद्रशेखर चाकूरकर हे लातूर शहरातील (Latur Crime News) आदर्श कॉलनी भागात राहत होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

चंद्रशेखर चाकूरकर हे रोज सकाळी फिरायला घराबाहेर पडायचे. त्यानंत ते स्वत:च्या घरी जाण्याऐवजी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरी जात होते. तिथे चहा पाणी झाल्यावर तेथे पेपर वाचत बसणे ही त्यांची मागील अनेक वर्षापासूनची सवय आहे. त्यानंतर बाजूला असलेल्या घरी जात होते. शिवराज चाकूरकर यांच्या कुटुंबातील व्यक्ती लातूर येथील निवासस्थी राहतात. कधीतरी ते येत असत. आज शिवराज चाकूरकर यांचा मुलगा शैलेश हे सकाळी घरातच होते. (Latur Crime News)

दरम्यान, नेहमीप्रमाणे चंद्रशेखर हे शिवराज चाकूरकर यांच्या घरी आले. घरी आल्यानंतर शैलेश यांनी त्यांना चहा घ्या मी आवरुन येतो असे सांगून निघून गेले. काही वेळाने गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यामुळे घरातील नोकर आणि शैलेश धावत हॉलमध्ये आले. त्यावेळी त्यांना चंद्रशेखर हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. या घटनेची माहिती लातूर पोलिसांना तात्काळ देण्यात आली.

चंद्रशेखर चाकूरकर हे वडिलोपार्जित शेती पाहत होते.
सध्या ते एका मुलासोबत शिवराज चाकूरकर यांच्या घराच्या बाजूला असलेल्या फ्लॅटमध्ये राहत होते.
वयोमानानुसार त्यांना अनेक व्याधीने ग्रासले होते. त्यामुळे ते सतत आजारी असायचे.
आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. त्यांचे चिरंजीव ॲड. लिंगराज पाटील (Adv. Lingaraj Patil)
यांनी सांगितले, त्यांची बायपास झाली होती. अशातच अनेक व्याधी त्यांना जडल्या होत्या.
सततच्या आजारपणाला ते कंटाळले होते. त्यातून हे कृत्य केले असावे, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

Web Title :- Latur Crime News | former union home minister shivraj patil chakurkar brother committed suicide by shooting himself

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chhatrapati Sambhajinagar Accident News | शहरातील काम आटोपून घराकडे निघालेल्या दांपत्याचा अपघात

HSC Paper Leak Case | बारावी पेपर फुटी प्रकरणी धक्कादायक माहिती समोर, दोन शिक्षकांसह पाच जणांना अटक

Pune Accident News | मुंबई-बेंगलोर महामार्गावर दोन ट्रकचा अपघात, ट्रकमध्ये अडकलेल्या दोघांची अग्निमन दलाकडून सुटका