Latur Crime News | लातूर हादरलं! बालगृहातील मुलीवर लैंगिक अत्याचार, 5 जणांवर गुन्हा दाखल

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – Latur Crime News | लातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये शहरातील महिला आणि बालविकास विभागाच्या एका निरीक्षण बालगृहातील अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार (Rape In Latur) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station, Latur) मुलीच्या मैत्रिणीसह पाच जणांविरुद्ध भारतीय दंड विधान आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका महिलेला अटकदेखील करण्यात आली आहे. (Latur Crime News)

 

काय आहे नेमके प्रकरण?

हाती आलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी निरीक्षण बालगृहातील एका महविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत असून, तिची आठवीपासूनची एक मैत्रीण तिच्याच सोबत शिक्षण घेत आहे. बुधवारी 18 जानेवारीला या दोघी मैत्रिणी कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गप्पा मारत होत्या. यावेळी पीडीत मुलीच्या मैत्रिणीच्या आणखी दोन मैत्रिणी तिथे आल्या यानंतर त्यांनी पार्टी करायला जाऊ म्हणून पीडित मुलीला आणि तिच्या मैत्रिणीला विनंती केली. यानंतर या दोघी त्यांच्याबरोबर जाण्यास तयार झाल्या. पार्टीला जाण्याचं ठरल्यावर आलेल्या मैत्रिणीने तिच्या पतीला बोलावून घेतले. त्यानंतर मैत्रिणीचा पती त्या ठिकाणी आला. यानंतर रिक्षाचालकासह पाच जण अंबाजोगाई मार्गावरील एका ज्वारीच्या शेतात गेले. (Latur Crime News)

त्या ठिकाणी सर्वजण रिंगण करून बसले. त्यावेळी रिक्षाचालकाने एका बाटलीतील गुंगीचे औषध पीडित मुलीला बळजबरीने पाजले आणि त्यानंतर रिक्षाचालकाने मुलीला बाजूला नेऊन तिच्यावर अत्याचार करायला सुरवात केली. या मुलीने विरोध केल्यानंतर त्याने तिला मारून टाकण्याची धमकी दिली. यातच मुलीला गुंगी आली. यानंतर जेव्हा पीडित मुलीला जाग आली तेव्हा ती बालगृहात होती. यानंतर या मुलीने आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती बालगृह प्रशासनाला दिली. त्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मुलीला सोबत घेऊन पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तर तीनपैकी एका मैत्रिणीला अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण लातूर जिल्हा हादरला आहे.

 

 

Web Title :- Latur Crime News | rape of a girl in a children home a case has been
registered against five persons

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा