Latur Crime | वृद्ध बहिणींचा खुन करुन मृतदेह पुरल्यावर त्यावर गायीला मारुन टाकले; पुरावा नष्ट करण्यासाठी जावयाने केले कृत्य

लातूर : Latur Crime | गेल्या एक महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या दोन मावस वृद्ध बहिणींचा त्यांच्याच जावयाने खुन केलेल्या उघडकीस आले आहे. जावयानेच दोघींचा खुन करुन त्यांचा मृतदेह (Latur Crime) पोत्यात बांधले. ते जवळच्या शेततळ्यात पुरले. कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून एक गाय मारुन त्यावर तिला पुरवण्यात आले. लातूर जिल्ह्यातील किल्लारी पोलिसांनी हा दुहेरी खुनाचा प्रकार उघडकीस आणला असून जावयाला घाटकोपर येथून अटक केली आहे.

राजू ऊर्फ त्र्यंबक गुरसिद्ध नारायणकर (रा. लामजना, ता. औसा, जि. लातूर) असे या जावयाचे नाव
आहे. तर, शेवंताबाई ज्योतिबा सावळकर (वय ८२) आणि त्रिवेणीबाई सगन सोनवणे (वय ८५, दोघी
रा. लामजना, ता. औसा़ जि. लातूर) अशी खुन केलेल्या दोन मावस बहिणींची नावे आहेत.

High Court | गर्भांत व्यंग्य असलेल्या महिलांना मिळाली गर्भपातास परवानगी; उच्च न्यायालयाचे आदेश, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने केली कायदेशीर मदत

या दोघी बहिणी एकत्र रहात होत्या. ७ जुलैपासून त्या कोणाला दिसल्या नाहीत. घरातील साहित्यही अस्ताव्यस्त पडले होते. त्यामुळे त्यांचे अपहरण झाल्याची फिर्याद अ‍ॅड. नवनाथ सोनवणे यांनी किल्लारी पोलिसांकडे दिली होती.  या दोघी बेपत्ता झाल्यापासून जावईही गावात दिसून येत नव्हता. तसेच शेवंताबाई यांना मुलगा नसल्याने त्यांनी आपली जमीन जावयाच्या नावावर न करता मुलीच्या नावे केली होती. हे समजल्यावर लातूर जिल्ह्यातील (Latur Crime) किल्लारी पोलिसांना शेवंताबाई यांचा जावई राजू नारायणकर याच्यावर संशय आला. पोलिसांनी पुणे, मुंबई येथे पथके पाठवून त्याचा शोध घेतला. शेवटी मुंबईतील घाटकोपर येथून राजू नारायणकर याला अटक करण्यात आली. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने आपणच दोघांचा खुन करुन त्यांचा मृतदेह पुरल्याची कबुली दिली.

जावयाने सासुचा खुन केला. त्याचवेळी मावस सासू त्रिवेणीबाई यांनी हा प्रकार पाहिला. त्या हा प्रकार लोकांना सांगतील, असे वाटल्याने त्याने तिचाही खुन केला. त्यानंतर त्याने दोघा बहिणींच्या मृतदेहाचे तुकडे करुन पोत्यात भरले. बाजूला असलेल्या शेततळ्यातील कपारीत पुरुन टाकले. तेथून मृतदेहाचा वास आला तर संशय येऊ नये, म्हणून त्याने एका गायीची हत्या करुन त्या मृतदेहांवर गायीला पुरले. हे समजल्यावर पोलिसांनी रात्रभर जागून  शेततळ्यातील पाणी उपसले आणि मृतदेह बाहेर काढले.

हे देखील वाचा

Solapur News | दुर्दैवी | व्यायामाला जातो सांगून घराबाहेर पडले, शेततळ्यात बुडून 2 मुलांचा मृत्यू

Union Home Ministers Medal – 2021 | सर्वोत्कृष्ट तपासाबाबत अ‍ॅन्टी करप्शन नाशिकचे
अधीक्षक सुनील कडासने यांना ‘केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ठ अन्वेषण पदक-2021’ जाहीर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Latur Crime | son law murdered two sisters who had been missing over month 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update