Latur District Bank Election | भाजपला धक्का ! लातूर जिल्हा बँक निवडणुकीत सर्व उमेदवारांचे अर्ज बाद

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन –  Latur District Bank Election | लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची (Latur District Bank Election) निवडणूक होत आहे. 19 जागांसाठी ही निवडणूक होणार असून त्यासाठी काँग्रेस (Congress), भाजप (BJP), अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. पंरतु, त्यामध्ये भाजपला मोठा दणका बसला आहे. भाजपच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचे अर्ज हे बाद झाले आहेत. यामुळे निवडणुकीआधीच भाजपचे उमेदवार पराभूत झाले आहेत. भाजप उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने काँग्रेसला (Congress) याचा मोठा फायदा होणार आहे. अर्जांची छाननी करत असताना त्यात असलेल्या त्रृटींमुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी (Returning Officer) त्यांचे सर्व अर्ज बाद केले आहेत.

 

लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या (BJP) सर्वच्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद केल्याने तेथील भाजप कार्यकर्ते राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करीत आहेत.
अर्ज बाद झाल्याने भाजपचा आरोप जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून आमचे अर्ज बाद कऱण्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे.
सत्ताधाऱ्यांनी भाजपच्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद करून लोकशाहीचा खून केला आहे. असं तेथील भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून म्हटलं जात आहे.

दरम्यान, या प्रकरणावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे तक्रार करणार आहोत.
तसेच सरकारी यंत्रणेच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहोत. अशी मागणीही भाजप पदाधिकाऱ्यांनी केलीय.
या संदर्भात आम्ही तक्रारीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे संपर्क केला असता ते फोन घेण्यास तयार नव्हते.
या प्रकरणी आम्ही न्यायालयात धाव घेणार आहोत. हा एक षडयंत्राचा भाग आहे आणि या षडयंत्रात जो कुणी सहभागी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. असं देखील सांगण्यात आलं आहे.

 

Web Title : Latur District Bank Election | all candidates application rejected of bjp in latur district central co operative bank election

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mutual Fund | ‘या’ फंडने दिला 64.8% चा शानदार रिटर्न ! 10 हजाराची गुंतवणूक झाली 1.57 कोटी रुपयांची, जाणून घ्या सविस्तर

Chitra Wagh | ‘जेंव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो तेंव्हा सत्ताधाऱ्यांचं खरं रूप समोर येतं’ – चित्रा वाघ

Post Office Scheme | ‘पोस्ट ऑफिस’च्या स्कीममधून देखील जमा करू शकता 1 कोटी रुपये; दरमहा करावी लागेल इतकी गुंतवणूक, जाणून घ्या