Latur Doctor Suicide News | दीड कोटीच्या खंडणीला वैतागून डॉक्टरची आत्महत्या

उदगीर : पोलीसनामा ऑनलाइन – Latur Doctor Suicide News | पोलीस ठाण्यात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी एका डॉक्टरकडे दीड कोटी रुपयांची खंडणी (Ransom) मागितली. पैशाच्या मागणीला वैतागून डॉक्टरने आत्महत्या केल्याचे (Doctor Committed Suicide) समोर आले आहे. या प्रकरणी खंडणी मागणाऱ्या आरोपीला वाढवणा पोलिसांनी (Wadhwana Police Station) अटक केली असून आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीने बनावट रेमडेसिविर इंजेक्शन (Remedacivir Injection) प्रकरणी गुन्हा (Udgir Crime) दाखल केला होता. दाखल अर्ज मागे घेण्यासाठी दीड कोटी रुपयांची खंडणी मागण्यात येत होती. आरोपीच्या त्रासाला वैतागून डॉ. नामदेव गिरी (Dr. Namdev Giri) यांनी आत्महत्या केली होती. ही घटना लातूर येथील खर्डा येथे घडली होती. (Latur Doctor Suicide News)

 

याबाबत डॉ. नामदेव गिरी यांच्या पत्नी सुनंदा गिरी (Sunanda Giri) यांनी वाढवणा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला. पोलिसांनी महेशकुमार जिवणे Maheshkumar Jivane (रा. उदगीर) व विकास देशमाने (Vikas Deshmane) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन महेशकुमार जिवणे याला अटक (Arrest) केली. तर विकास देशमाने हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (Latur Doctor Suicide News)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Corona Second Wave) आरोपी महेशकुमार जिवणे यांनी त्यांची आई शांताबाई त्र्यंबकराव जिवणे यांना उदयगिरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये (Udayagiri Multispeciality Hospital) उपचारासाठी दाखल केले होते.
उपचारादरम्यान शांताबाई यांचा मृत्यू झाला होता.
जुलै 2021 मध्ये महेशकुमार जिवणे यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात (Udgir Rural Police Station) एक तक्रार दाखल केली होती.
रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांच्या आईला डॉ. नामदेव गिरी व डॉ. माधव चुंबले (Dr. Madhav Chumble) यांनी संगनमत करुन उपचारासाठी बनावट भेसळयुक्त रेमडेसिविर इंजेक्शन दिले. हे इंजेक्शन खरे असल्याचे भासवून त्यांची 90 हजारांची फसवणूक (Cheating) केल्याची तक्रार होती. या प्रकरणात डॉ. नामदेव गिरी व डॉ. माधव चुंबले यांच्यावर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात IPC 420, 274, 275, 276, 34 नुसार गुन्हा दाखल केला होता. दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपींनी डॉ. नामदेव गिरी यांच्याकडे दीड कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

 

आरोपींच्या मानसिक त्रासाला वैतागून डॉ. नामदेव गिरी यांनी 25 मे 2022 रोजी सायंकाळी खर्डा येथील त्यांच्या राहत्या घरी शेतातील पिकावर फवारणीचे औषध प्राशन केले.
त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु मंगळवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 

Web Title :- Latur Doctor Suicide News | latur doctor commits suicide due to demanding ransom

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा