Latur News : शिपायाने कार्यालयातच गळफास घेऊन केली आत्महत्या

लातूरः पोलीसनामा ऑनलाईन – एका 47 वर्षीय कर्मचा-याने आपल्याच कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लातूर येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या जिल्हा सांख्यिकी विभागात हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. त्याने कार्यालयात आत्महत्या करण्यामागे काही वेगळ कारण आहे का ? कार्यालयातील वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली का? असे प्रशन यामुळे उपस्थित केले जात आहेत.

सूर्यकांत श्रीमंगले (वय 47) असे या कर्मचा-याचे नाव असून ते जिल्हा सांख्यिकी विभागात सेवक या पदावर कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीमंगले यांने आपल्याच कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सकाळी कार्यालय सुरु होण्यापूर्वी त्यांचा मृतदेह इतर कर्मचा-यांनी पाहिला अन् एकच धांदल उडाली. मृत श्रीमंगले हे काही दिवसांपासून आजारी होते. मात्र त्यांनी आत्महत्या कार्यालयात का केली याचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.