Latur News | लातूर जिल्ह्यातील घटना ! लग्नसमारंभात सुमारे 250 जणांना विषबाधा, वेळीच उपचार केल्याने धोका टळला

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – Latur News | लग्नसमारंभ सोहळ्यामध्ये जवळपास 250 जणांना विषबाधा (Poisoning) झाल्याचा प्रकार घडला आहे. विषबाधा झालेल्या व्यक्तींवर वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले आहे. महत्वाची बाब म्हणजे या विषेबाधेमुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही. परंतु, लग्नसमारंभासारख्या शुभकार्यामध्ये विषबाधा झाल्यामुळे दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकार लातूर जिल्ह्यातील (Latur News) निलंगा तालुक्यातील केदारपूर काटेजवळगा येथील लग्नकार्यात घडला आहे.

लातुर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील साकोळ जवळगा येथील मुलाचा निलंगा तालुक्यातील केदारपूर काटेजवळगा येथील मुलीशी 22 मे रोजी विवाह (Marriage) झाला. या लग्नसोहळ्याला केदारपूर, अंबुलगा, सिंदखेड आधी गावातील वर्‍हाडी मंडळी आली होती. लग्नसोहळा पार पडल्यानंतर या वऱ्हाडी मंडळीने जेवन केले. परंतु, काही लोकांच्या पोटात दुखायला सुरूवात झाली. त्याचबरोबर त्यावेळी अनेकांना उलट्या, जुलाबाचा त्रासही सुरू झाला. (Latur News)

दरम्यान, अशा प्रकारामुळे रुग्णांना वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र (Primary Health Center) आणि निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात (Sub-District Hospital) दाखल करण्यात आले आहे. विषबाधेमुळे जवळपास 250 जणांवर उपचार करण्यात आले. त्याचबरोबर यशस्वी उपचार केल्यानंतर सर्वांना घरी पाठवण्यात आले. विषबाधा गंभीर स्वरुपाची नसल्यामुळे कोणाच्याही आरोग्यास हानी पोहोचली नाही. असं डाॅक्टरांकडून सांगण्यात आले.

Web Title : Latur News | 250 people face food poisoning problem in marriage function latur news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kirit Somaiya on Uddhav Thackeray | ‘नवाब मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊद गँगशी संंबंध आहेत का?’ – भाजप नेते किरीट सोमय्या

Money Laundering Case | नवाब मलिकांचे पाय खोलात ! डॉन दाऊदशी संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे; न्यायालयाचे निरीक्षण

 

Mumbai-Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खाद्यतेलाचा टँकर पलटी; तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांची मोठी झुंबड

 

Pune Crime | लाल महालात ‘लावणी’ करणे पडले महागात ! नृत्यांगणा वैष्णवी पाटील हिच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

 

Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?; जाणून घ्या मुख्य शहरातील दर