Latur News | धक्कादायक ! दीड वर्षीय चिमुरडीचा जन्मदात्या बापानेच दारुच्या नशेत घेतला जीव; लातूर जिल्ह्यातील घटना

लातूर (Latur News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online)  – Latur News | लातूर जिल्ह्यातून (Latur distric) एक माणुसकीला काळीमा फासवणारी घटना समोर आली आहे. दारुच्या नशेत जन्मदात्या बापानेच आपल्या दीड वर्षीय मुलीला हौदात बुडवून जीवे मारल्याची धक्कादायक घटना आशिव (ता. औसा ) (Ashiv Tal. Ausa) येथे घडली आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, निष्पाप चिमुकलीला आपले प्राण गमवावे लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी मृत मुलीच्या आजोबांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सृष्टी संतोष भोंडे (Srishti Santosh Bhonde) (वय दीड वर्ष ) असे मृत चिमुरडीचे नाव आहे. तर संतोष भोंडे असे गुन्हा दाखल झालेल्या निष्ठूर बापाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, 11 वर्षापूर्वी पूजा हिचा विवाह आशिव येथील संतोष भोंडे (Santosh Bhonde) यांच्याशी झाला होता. त्यांना 1 मुलगा विश्व आणि ईश्वरी व सृष्टी अशा 2 मुली होत्या. मात्र संतोष (Santosh Bhonde) दारूच्या आहारी गेल्याने तो पूजाला सतत मारहाण करत असत. त्याच्या जाचाला कंटाळून पूजाने महिला तक्रार निवारण तसेच भादा पोलीसात तक्रार केली होती. मात्र संतोषमधे (Santosh Bhonde) काही बदल झाला नव्हता. तो व्यसनाच्या इतका आहारी गेला की त्याने पोटच्या
पोरीचाच नशेत जीव घेतला. घरातील सगळे शेतात गेले असताना दीड वर्षीय श्रुष्टीला त्याने मारहाण
करून घरातील हौदात बुडवले. ही घटना श्रुष्टीच्या भावंडांनी रात्री घरी परतलेल्या आजोबाला
सांगितली. आजोबाच्या फिर्यादीवरून संतोषवर (Santosh Bhonde) भादा पोलीस ठाण्यात
(Bhada police station) गुन्हा करण्यात आला आहे. भादा पोलीस (Bhada police ) तपास करत आहेत.

हे देखील वाचा

Gold Price Today | घरात असेल लग्नकार्य तर ताबडतोब खरेदी करा सोने, 10841 रुपयांनी मिळत आहे स्वस्त, पहा 10 ग्रॅमचे दर

Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 218 नवीन रुग्ण, 275 जणांना डिस्चार्ज

IndiGo Monsoon Sale Offer | इंडिगोने आणली Monsoon Sale Offer; मात्र 998 रुपयात करा विमान प्रवास

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Latur News | father kills daughter in latur police file case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update