Latur News | लातूर-औसा महामार्गावर भीषण अपघातात पती-पत्नी ठार, तर मुलगी गंभीर जखमी

औसा न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Latur News | ओव्हरटेक करताना दुचाकीची धडक ट्रकला बसून झालेल्या भीषण अपघातात (terrible accident) पती-पत्नीचा मृत्यू झाला तर मुलगी गंभीर जखमी झाली. हा अपघात लातूर-औसा महामार्गावर (Latur-Ausa Highway) शुक्रवारी (दि.23) दुपारी एकच्या सुमारास झाला. अपघातग्रस्त ट्रक व दुचाकीवरील तिघेजण औश्याच्या दिशेने जात होते.

 

राजू राठोड (वय-46), शकुबाई राजू राठोड (वय-40 रा. वांजरखेडा तांडा, ता. भालकी, जि. बीदर) असे मृत्यू झालेल्या पती-पत्नीची नावं आहेत. तर स्वाती राठोड (वय-17) ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर लातूरच्या शासकीय रुग्णालयात (Government Hospital, Latur) उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरंगुळहुन वांजरखेडा (जि. बीदर) कडे दुचाकी (एमएच 24, एसी 8903) वरुन राजू राठोड, शकुबाई राठोड व मुलगी स्वाती हे तिघेजण जात होते. लातूरहून सोलापूरकडे ट्रक (टीएन 34 एझेड 2008) हा जात होता. तेव्हा ओव्हरटेक (Overtake) करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीची ट्रकला जोराची धडक बसली. यामध्ये दुचाकीवरील तिघेजण ट्रकच्या चाकाखाली आले. अपघातात शकुबाई यांचा जागीच मृत्यू झाला. तर वडील आणि मुलीला रुग्णालयात दाखल केले असता राजू राठोड यांचा मृत्यू झाला.

 

शरीरापासून एक पाय वेगळा

हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीवरील एकाचा पाय तुटून शरीरापासून वेगळा झाला.
तसेच घटनास्थळी रक्तमासांचा सडा पडला होता.
ट्रकखाली अडकून पडलेल्यांना प्रत्यक्षदर्शी नागरिक आणि पोलिसांनी बाहेर काढले.

Web Title : Latur News | latur accident terrible accident latur ausa highway husband wife killed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pimpri Chinchwad Police | रावण टोळी प्रमुखाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या 6 सराईतांना अटक; पिस्तुल, काडतुस जप्त

Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्रा केसमध्ये समोर आला शर्लिन चोपडाचा नवीन व्हिडिओ, केला धक्कादायक खुलासा (व्हिडीओ)

Varsha Gaikwad | शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा, यंदाही शाळेच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात