Latur News | 8 महिन्यापासून पगार न मिळाल्याने निलंगा नगरपरिषदेच्या कंत्राटी सफाई कामगाराची आत्महत्या, प्रचंड खळबळ

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या 8 महिन्यांपासून पगार न मिऴाल्याच्या विवंचनेतून लातूर (Latur) जिल्ह्यातील निलंगा नगरपरिषदेतील Municipal एका कंत्राटी सफाई कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या  केली आहे. बुधवारी (दि. 9) सकाळी ही धक्कादायक घटना घडली. या घटनेने नगरपरिषद (Municipal Council) वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर संतप्त कर्मचाऱ्यांनी नगरपरिषद Municipal कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले होते. दरम्यान कर्मचाऱ्यांचा वाढता असंतोष लक्षात घेऊन नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत कर्मचाऱ्यांने म्हणणे ऐकून घेत समजूत काढली.

बाबुराव नामदेव गायकवाड असे आत्मत्या केलेल्या सफाई कामगाराचे नाव आहे.
ते गेल्या 32 वर्षापासून नगरपालिकेत कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, निलंगा नगरपरिषदेत 36 सफाई कर्मचारी हे कायमस्वरूपी आहेत.
तर 70 कर्मचारी हे कंत्राटी म्हणून कार्यरत आहेत.
या कर्मचाऱ्यांचे नियंत्रण एका खासगी एजन्सीला दिले आहे.
नगरपरिषदेने एजन्सीला सर्व बिले अदा केली असतानाही एजन्सीने 3 महिन्यांपासून कामगारांचा पगार दिला नाही. त्यामळे कामगार त्रस्त आहेत.
याच विवंचनेतून बाबुराव गायकवाड याने नगरपरिषद आवारातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्यांचा 8 महिन्यापासून पगार थकला होता.

या घटनेनंतर संतप्त कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी आणि कंत्राटदार यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही.
तोपर्यंत मृतदेह झाडावरून खाली काढू देणार नाही अशी भूमिका घेतली होती.
नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
त्यानंतर मृतदेह झाडावरुन खाली काढून शवविच्छेदनासाठी निलंगा येथील सरकारी रुग्णालयात पाठवला.
या प्रकरणी दत्ता गायकवाड यानी निलंगा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Also Read This : 

Latur News:  मोबाईलवर मोठ्याने बोलू नको म्हटल्याने एकाचा दगडाने ठेचून खून

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

 शेतीच्या वादातून भावासह जावयाचा खुन

 देवणी तालुक्यातील सराफा व्यापार्‍याची सुसाईड नोट लिहून आत्महत्या

  शिपायाने कार्यालयातच गळफास घेऊन केली आत्महत्या