Latur News | सोयाबीन बियाणांची अव्वाच्या सव्वा दराने विक्री, शेतकर्‍यांची राजरोसपणे लूट ! ऐन पेरणीच्या तोंडावर बळीराजा अडचणीत

अहमदपूर (Latur News) : पोलीसनामा ऑनलाईन – (Latur News) अहमदपूर तालुक्यात शेती मशागतीची कामे पूर्ण झाली असून आता पेरणीसाठी शेतकरी पावसाची वाटत पाहत आहेत. तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनची 31 हजार हेक्टरवर पेरणी होणार आहे. त्यासाठी 21 हजार 250 क्विंटल बियाणे लागणार आहे. मात्र खासगी कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्यांचे दर शेतक-याच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. कंपन्या बियाणे शेतकऱ्यांना अव्वाच्या-सव्वा किंमतीला विक्री करुन राजरोसपणे लुटत आहेत.गतवर्षीच्या तुलनेत यंदा 1200 रुपये शेतक-यांना जादा मोजावे लागत आहेत.

यंदा शेतक-यांनी बियाणे कंपन्याना सोयाबीन कमी भावाने दिले. आता मात्र बियाणे म्हणून तेच सोयाबीन पुन्हा शेतक-यांच्या माथी मारले जात आहे. एकीकडे खतांच्या किंमती कमी झाल्या असल्या तरी खासगी कंपनीच्या सोयाबीन बियाणांसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. बियाणे महामंडळाच्या सोयाबीन बियाण्याचे दर नियंत्रणात असले तरी बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. शिवाय घरगुती बियाणे देखील यावेळी उपलब्ध नाही.

त्यामुळे शेतक-यांना खासगी कंपनीचे बियाणे घेतल्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे. खत विक्रीवर जसे शासनाचे नियंत्रण आहे तसेच बियाणे विक्रीवर देखील असावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत. दरम्यान प्रभारी तालुका कृषी अधिकारी भूजंग पवार म्हणाले की, कृषी विभागाने खत आणि बियाणाचे दरफलक लावलेले आहेत. रासायनिक खत, बियाणे एमआरपीपेक्षा जादा दराने विक्री करत असल्यास कृषी केंद्र चालकावर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

हे देखील वाचा

 

फुफ्फुसांना ‘निरोगी’ ठेवायचंय तर ‘ही’ 5 योगासने करा, कोरोनापासून होईल बचाव, जाणून घ्या

 

1 वर्षाच्या वॉरंटीसह येथे मिळत आहे जुनी Wagon R कार ! जाणून घ्या किती खर्च करावा लागेल

 

दररोज दह्यासोबत गुळाचं सेवन या वेळी करा, Immunity वाढण्यासह होतील ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या

 

Maratha Reservation | ‘…तर मराठा आरक्षणासाठी जो कोणी पुढे येईल त्याला भाजपाचा पाठिंबा राहील’ – चंद्रकांत पाटील

पाणी असणार्‍या ‘या’ 5 फळांचं नक्की सेवन करा, डिहायड्रेशनपासून वाचेल शरीर; जाणून घ्या

Web Titel :  Latur News | Soybean seeds sold at a quarter price, farmers looted ! farmers in trouble