Latur Scam | लातुरमध्ये लिपिकानेच केला कोट्यवधीचा घोटाळा, पाच तहसीलदार गोत्यात; नव्या माहितीने खळबळ

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – लातूर जिल्हाधिकारी (Latur District) कार्यालयातील महसूल शाखेतील (Revenue Branch) एका लिपिकाने वेगवेगळ्या योजनांच्या सरकारी निधीमधून केलेल्या घोटाळ्यात (Latur Scam) आता नवीन माहिती समोर आली आहे. यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. लातूर (Latur News) शासकीय कार्यालयाशी संबंधित दोन बँक खात्यातील 22 कोटी 87 लाख 62 हजार 25 रुपयांच्या रकमेचा अपहार (Latur Scam) झाल्याची माहिती समोर आली होती. याचा तपास करत असताना या रक्कमेत वाढ होताना पाहायला मिळत आहे. 22 कोटींचा आकडा आता 26 कोटींवर गेला आहे.

 

हा प्रकार 2015 ते 2022 या सात वर्षातील जलयुक्त शिवार अभियानंतर्गत (Jalyukta Shivar Yojana Scam Case) निधी वितरणाचा आदेश दिल्यानंतर झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तहसीलदार महेश मुकुंद परांडेकर (Tehsildar Mahesh Mukund Parandekar) यांनी फिर्याद दिली आहे. यावरून लिपिक मनोज नागनाथ फुलेबोयणे (Clerk Manoj Nagnath Phuleboyne) यांच्यासह अरुण नागनाथ फुलेबोयणे (Arun Nagnath Phuleboyne), सुधीर रामराव देवकते (Sudhir Ramrao Devkate), चंद्रकांत नारायण गोगडे (Chandrakant Narayan Gogde) यांच्याविरोधात स्वत:च्या आणि इतर तिघांच्या खात्यात पैसे जमा करुन शासनाची फसवणूक (Fraud) केल्याचा गुन्हा (FIR) एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) दाखल करण्यात आला आहे. (Latur Scam)

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक (Arrest) केली आहे.
त्यांना न्यायालयात हजर केले असता मंगळवार (दि.30) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
परंतु यातील तत्कालीन पाच तहसीलदार यांच्यावर देखील कारवाईचा बडगा उगारत जिल्ह्यातील पाच तहसीलदारांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
या संपूर्ण प्रकरणात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी (Collector Prithviraj BP) आणि पोलीस अधीक्षक सोमय मुंडे (SP Somay Munde) यांनी मौन बाळगले आहे.
त्यामुळे हे प्रकरण काय वळण घेतंय आणि घोटाळ्याचा आकडा आणखी किती वाढतोय याकडे संपूर्ण लातूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

 

Web Title :- Latur Scam | 26 crore funds in jalyukta shivar yojana were misappropriated by the clerk

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bachchu Kadu | ‘शिंदे गटाच्या उठावामुळे राज्यात राजकीय अस्थिरता;’ आमदार बच्चू कडूंचा शिंदे गटाला घरचा आहेर

Pune Crime News | जेवण न देता दारु पिलेल्या दुसर्‍या पत्नीचा लाथाबुक्क्यांनी केला खून; रिक्षाचालकाला अटक

Mumbai Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू