तांत्रिक कारणामुळे ‘चांद्रयान-२’ मोहिम तात्पुरती स्थगित

श्रीहरीकोटा : वृत्तसंस्था – भारताच्या बहुचर्चित चांद्रयान २ चे प्रक्षेपण सोमवारी काही तांत्रिक कारणामुळे लांबणीवर टाकण्यात आले आहे. नियोजित कार्यक्रमानुसार हे चांद्रयान सोमवारी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी झेपावणार होते. त्यासाठी काऊंट डाऊनही सुरु झाले होते. पण प्रत्यक्ष प्रक्षेपणाला ५६ मिनिटे २४ सेकंद उरले असताना काही तांत्रिक दोष लक्षात आल्याने हे प्रक्षेपण स्थगित करण्यात आल्याची अधिकृत घोषणा इस्त्रोकडून करण्यात आली.

आता या प्रक्षेपणाची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात आले. काऊंटडाऊन सुरु झाल्यानंतर क्रायोजेनिक इंजिनात इंधन भरण्यात अडचण निर्माण होत असल्याचे दिसून आल्याने ही मोहीम स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आली.

श्रीहरिकोटा येथील धवन स्पेस सेंटरमधून चांद्रयान २ चे प्रक्षेपण होणार होते. त्याची सर्व तयारी गेल्या काही दिवसांपासून येथे सुरु होती. हे प्रक्षेपण प्रत्यक्ष पाहण्यासाठी देशभरातून तसेच जगाभरातून मिडिया श्रीहरीकोटा येथे आला होता. त्याबाबतची तयारी कशी सुरु आहे. काऊंट डाऊन चे प्रक्षेपण जगभरात सुरु होते. मात्र, त्यात तांत्रिक अडचण उद्भवल्याचे लक्षात आल्यावर हे काऊंट डाऊन थांबविण्यात आले होते. त्यानंतर इस्त्रोने अधिकृतपणे ही मोहीम सध्या स्थगित केल्याचे जाहीर केले.

 जिरे-आल्या चा रस प्या ! १० दिवसात पोट कमी करा

 कॅन्सर च्या उपचाराचा दावा करणाऱ्या मार्केटमुळे जगभरातील डॉक्टर चिंतेत !

 सावधान ! साबण आणि टूथपेस्ट ने होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

 डायनिंग टेबलपेक्षा जमिनीवर बसून जेवण करणे योग्य ; जाणून घ्या फायदे

 खुशखबर ! १००० हून अधिक ‘औषध -गोळ्या’ होणार स्वस्त

‘परफेक्ट’ लिपस्टिक लावण्यासाठी काही खास टिप्स – जाणून घ्या