भारताची पहिली इलेक्ट्रिक बाईक लाँच, २५ जूनपासून प्री बुकिंग सुरु

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताची पहिली इलेक्ट्रिक बाईक लाँच झाली असून येत्या २५ जूनपासून प्री बुकिंगही सुरु होणार आहे मात्र या बाईकची किंमत किती हे अजून गुलदस्त्यात आहे. Revolt Intellicorp हे या इलेक्ट्रिक बाईक निर्मिती करणाऱ्या कंपनीचे नाव असून ‘आरव्ही ४००’ हे मॉडेल लॉन्च केले आहे. केवळ एक हजार रुपयात या बाईकसाठी Revoltmotors.com वर बुकिंग करता येणार आहे.

हे आहेत फीचर्स
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कनेक्ट करून My Revolt App च्या मदतीने या बाईकला सुरु करू शकता; यासोबत चावी, सेल्फ स्टार्टची सुविधा देखील उपलब्ध आहे.

अ‍ॅपच्या मदतीने तुमची किती बॅटरी शिल्लक आहे हे जाणून घेऊ शकता. अजून आपण किती दूर जाऊ शकतो? हे कळणार आहे. यासोबतच बॅटरी लाईफ पर्संटेजमध्ये दिसणार आहे.

अ‍ॅपच्या मदतीने युझर अगदी सहज बाईक ट्रॅक करू शकतो.

चार्जिंग करण्यासाठी वेग-वेगळे मोड असून यात ऑन बोर्ड किंवा पोर्टेबल चार्जिंग सुविधा उपलब्ध आहे.
ही बाईक AI (Artificial Intelligence) वर काम करत असल्यामुळे तुम्ही व्हाईस कमांड देखील देऊ शकता. साधारण ८५ किमी प्रति तास वेग असणार आहे.