खराब हवामानामुळं 16 मिनिट आधी थांबले मानवयुक्त SpaceX चे लॉन्चिंग, 30 मे रोजी पुढचं ‘ट्रायल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : अमेरिकेच्या इतिहासात 9 वर्षांनंतर इतिहास रचला जाणार होता, परंतु त्याला खराब वातावरणाचे ग्रहण लागले, कारण आज मानवी अंतराळ मोहीम थांबवावी लागली, अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने खासगी कंपनी स्पेसएक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात अंतराळवीर पाठविण्याची तयारी केली होती.

खरं तर, दुपारी 2:03 च्या सुमारास नासाच्या फाल्कन रॉकेटमधून दोन अमेरिकन अंतराळवीरांना आयएसएसकडे पाठवण्यात येणार होते. परंतु या उपलब्धीपूर्वीच या अभियानास खराब हवामानामुळे थांबवावे लागले.

खराब हवामानामुळे स्पेसक्राफ्टचे प्रक्षेपण झाले नाही

खराब हवामानामुळे स्पेसक्राफ्टचे प्रक्षेपण करण्यात आले नाही, त्यानंतर या मोहिमेसाठी 3 दिवसांनंतरची वेळ निश्चित करण्यात आली आहे. या स्पेसक्राफ्टच्या आत बसलेले अमेरिकन अंतराळवीर रॉबर्ट बेनकेन आणि डग्लस हर्ली हे असून या दोघांनीही यापूर्वी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची यात्रा केलेली आहे. हे दोन्ही अंतराळवीर अमेरिकन कंपनी स्पेसएक्सच्या अंतराळ यान (स्पेसक्राफ्ट) ड्रॅगनकडून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाठवले जातील. स्पेसएक्स ही अमेरिकन उद्योगपती एलन मस्कची कंपनी आहे, ती भविष्यातील बर्‍याच योजना आणि मिशनवर नासाबरोबर काम करत आहे.

डेमो -2 लाँच

वास्तविक स्पेसएक्स ड्रॅगन स्पेसक्राफ्ट अमेरिकेचे सर्वात विश्वासार्ह रॉकेट मानले जाते, ज्याला विश्वासार्ह फाल्कन -9 च्या वर लावण्यात आले आहे, त्यानंतर फाल्कन -9 रॉकेटला लाँच कॉम्प्लेक्स 39ए पासून लाँच केले जाणार होते, त्या प्रक्षेपणाचे नाव ‘डेमो -2’ ठेवण्यात आले आहे. यापूर्वी, डेमो -1 मिशनमध्ये ड्रॅगन स्पेसक्राफ्टने विविध सामान आणि त्या संबंधित सर्व वस्तूंना अंतराळ स्थानकात यशस्वीरित्या पोहोचवण्यात आले होते.

9 वर्षांनंतर मिळणार होते यश

याबद्दल नासाने ट्वीट केले होते की, 9 वर्षांनंतर अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने आपला कमर्शियल ग्रुप प्रोग्रॅम पुन्हा सुरू केला आहे, आणि यावेळेस अमेरिकेला आपल्या अंतराळवीरांना अंतराळात पाठविण्यासाठी रशिया आणि युरोपियन देशांची मदत घ्यावी लागणार नाही, ज्यामुळे शेकडो अब्ज रुपये देखील वाचू शकतात.