लोणीकाळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी ‘बीट मार्शल’ सेवा सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी ‘बीट मार्शल’ सेवा सुरू केली आहे.

गुढी पाडव्याच्या मुहूर्त साधत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून बिट मार्शल सुरु केले आहे. यावेळी परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक आयुक्त कल्याणराव विधाते, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पंचायत समिती सदस्य हेमलता बढेकर, ऊरळी कांचनचे सरपंच संतोष कांचन, संचिता कांचन आदी उपस्थित होते.

पुणे ग्रामीण पोलिस दलातून लोणी काळभोर व लोणीकंद ही दोन पोलीस ठाणी शहर पोलीस आयुक्तालयात समाविष्ट झाली. 30 पोलीस पोलीस ठाण्यात ही बिट मार्शल सेवा सुरू असून, त्या अंतर्गत नागरिकांना तात्काळ मदत मिळते. तशीच मदत मिळावी यासाठी या ठाण्यात देखील बिट मार्शल सुरू केले आहेत.

लोणी काळभोर परिसर पुणे शहराला लगत आहे. या भागात नागरिकरणाचा वेग वाढत आहे. लोणी काळभोर, कदमवाक वस्ती, कुंजीरवाडी, ऊरळी कांचन, ऊरळी देवाची या भागात गृहप्रकल्प साकारत आहेत. बीटमार्शल तीन गटात विभागणी केली आहे. लोणी टाऊन मार्शल, ऊरळी कांचन मार्शल, ऊरळी देवाची मार्शल असे तीन गट आहेत.