उद्या लाँच होतय नवीन 6 सीटर MG हेक्टर प्लस, जाणून घ्या वैशिष्ट्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – MG मोटर इंडिया कंपनी आपली हेक्टर प्लस ही नवीन गाडी उद्या (13 जुलै) लाँच करत आहे. भारतात लाँच होणारे हे MG हेक्टर प्लस या ब्रँडचे तिसरे मॉडल टोयोटा इनोव्हा क्रिस्टाला टक्कर देणार आहे. दरम्यान, कोव्हिड – 19 च्या प्रादुर्भावा दरम्यान हे नवीन मॉडेल व्हर्चुअल कॉन्फरन्सच्या माध्यमातून लाँच करण्यात येणार असल्याचे समजते. या ऑनलाईन लॉंचिंगचे लाईव्ह टेलिकास्ट उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही 13 जुलै रोजी दुपारी 12:30 वाजता पाहू शकता.

माहितीनुसार, नवीन हेक्टर प्लस खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी कंपनीने लाँचच्या एक आठवडा आधीच बुकिंग सुरु केले असून तब्बल 50,000 रुपयांत हेक्टर प्लस ऑनलाईन किंवा भारतातील कोणत्याही डीलरकडे बुक करू शकता. लाँचनंतर त्वरितच हेक्टर प्लसची डिलिव्हरी सुरु करण्यात येणार असल्याचे समजते. या मॉडेलचे उत्पादन गुजरातमधील हालोल या ठिकाणी सुरु झाल्याचे MG मोटरने सांगितले आहे. शिवाय, सहा सीटरच्या या SUV ची डिलिव्हरी विविध डीलर्सकडे सुरू करण्यात आली आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार सहा सीटरचे प्रीमियम कॉन्फिगरेशन असलेल्या MG हेक्टर प्लस या गाडीत मधल्या रांगेत कॅप्ट्न सीट्स आहेत. त्याचप्रमाणे 10.4 इंचाचे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, पॅनोरॅमिक सनरुफ, लेदर अपहोल्स्टरी (सीट्सचे व गाडीतील इ. भागांचे कव्हर), इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर 7 इंचाचे MID आणि अशी अनेक प्रीमियम वैशिष्ट्ये गाडीच्या केबिनमध्ये उपलब्ध करून दिली आहेत. हेक्टर प्लसच्या बाहेरील बाजूस वेगवेगळे डिझाईन अपडेट्स करून देण्यात येतील, जेणेकरून या सहा सीटर SUV व पाच सीटर हेक्टर प्लस मॉडेलमध्ये फरक दिसून येईल. सहा सीटर हेक्टर प्लसमध्ये LED हेडलॅम्प, LED DRLs, LED टेललाईट्स, अपडेटेड फ्रंट ग्रिल आणि टेलगेट अशा काही डिझाईन अपडेट्स केल्या आहेत.

या ब्रॅंडच्या पाच सीटर मॉडेलप्राणेच या नवीन सहा सीटर MG हेक्टर प्लसमध्ये इंजिन आणि ट्रान्समिशन पर्याय आहेत. सहा सीटर MG हेक्टर प्लसमध्ये 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे जे सहा स्पीड मॅन्युअल किंवा सात स्पीड DCT ऑटोमॅटिक ट्रान्समिशन युनिटला जोडून येते. हायब्रीड आणि नॉन हायब्रीड असे या या इंजिनचे दोन प्रकार आहे . दोन्ही प्रकारचे इंजिन 140bhp आणि 250Nm चे टॉर्क देतात. तसेच ही गाडी 2.0 लिटर डिझेल इंजिनमध्येसुद्धा उपलब्ध आहे, जी 170bhp आणि 350Nm टॉर्क देते. परंतु सहा स्पीड मॅन्युअल गियरबॉक्ससोबत येणाऱ्या या इंजिनमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय उपलब्ध नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like