Lava Pulse फिचर फोन झाला लाँच, मिळणार हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर मॉनिटर, जाणून घ्या किंमत

पोलिसनामा ऑनलाईन – देशी मोबाइल फोन निर्माता कंपनी लावाने भारतीय बाजारपेठेत नवा फिचर फोन लाँच केला आहे. हा फोन परवडणार्‍या किंमतीत नवीन फिचरसह येतो. कंपनीने या फोनला Lava Pulse असे नाव दिले आहे. नावाने त्याच्या फिचर्सचा अंदाज लावला जाऊ शकतो. डिव्हाइसमध्ये इन-बिल्ट हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर मॉनिटर आहे. या फिचरसह येणारा हा पहिला फिचर फोन आहे. Lava Pulse युजर्सचे हार्ट रेट आणि रक्तदाब दोन्ही मोजू शकते. यासाठी फोनच्या मागील बाजूस सेन्सर आहे. या व्यतिरिक्त डिव्हाइसमध्ये १८०० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे, जी कंपनीनुसार ६ दिवसांपर्यंत टिकू शकते.

लावा पल्सची किंमत
लावाच्या या फिचर फोनची किंमत फक्त १९४९ रुपये आहे. हा फोन फक्त एका रंगात रोज गोल्डमध्ये लाँच केला आहे. लावा पल्स अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टसह दहा लाखाहून अधिक रिटेल स्टोअरमधून देशात खरेदी करता येईल.

स्पेसिफिकेशन्स
तांत्रिक तपशीलांबाबत हा स्मार्टफोन २.४ इंच (२४०×३२० पिक्सेल) च्या QVGA डिस्प्लेसह येतो. फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट आणि ड्युअल सिम स्लॉट उपलब्ध आहे. लावा या फोनमध्ये ३२ एमबी रॅम आणि एक एक्सपांडेबल मेमरीचा पर्याय देतो, जी मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते.

या फिचर फोनमध्ये १०० एसएमएस आणि ५०० फोन बुक संपर्क जतन करू शकता. यात १८०० एमएएच बॅटरी दिली गेली आहे, जी कंपनीच्या मते ६ दिवसांपर्यंत टिकू शकतो. या फोनमध्ये मायक्रो यूएसबी, ३.५ एमएम ऑडिओ जॅक, वायरलेस एफएम रेडिओ इत्यादी सपोर्ट आहे.

लावा पल्समध्ये ऑटो कॉल रेकॉर्डिंग फिचर उपलब्ध आहे. फोनमध्ये इंग्रजी, हिंदी, तमिळ, कन्नड, तेलगू, गुजराती आणि पंजाबी भाषांचा सपोर्ट आहे. लावाच्या या फिचर फोनमध्ये हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर मॉनिटरिंगचे फिचर आहे. युजर्सना फोनच्या मागील बाजूस आपले बोट ठेवावे लागेल, त्यानंतर त्याची संपूर्ण माहिती डिस्प्लेवर उपलब्ध होईल. युजर्स हा डेटा सेव्ह करुन डॉक्टरांनाही दाखवू शकतात.