Lava True Wireless Earbuds । 1 रुपयांत मिळणार वायरलेस Earbuds; ‘या’ तारखेपासून घेता येणार ‘Lava’ च्या इंट्रोडक्टरी ऑफरचा लाभ

पोलीसनामा ऑनलाइन – Lava True Wireless Earbuds । जगभरामध्ये 21 जून रोजी हा दिवस वर्ल्ड म्युझीक डे (World Music Day) म्हणून साजरा केला जातो. यावरून आता भारतातील (india) एक मोबाईल कंपनी असलेली लावाने ट्रू वायरलेस (True Wireless) सेगमेंटमध्ये प्रवेश करत आपला पहिला प्रोडक्ट लॉन्च केले आहे. विशेष म्हणजे या कंपनीने हे इयरबड्स (Earbuds ) एका इंट्रोडक्टरी ऑफर सोबत लाँच करण्यात आले आहेत. मुख्यतः ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना हे इयरबड्स (Lava E-store,) ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून फक्त 1 रूपयांत खरेदी करण्याची सध्या संधी मिळणार आहे. महत्वाची बाब म्हणजे 24 जून रोजी दुपारी 12 वाजता याऑफेरला प्रारंभ होणार आहे. आणि स्टॉक संपेपर्यंत ते सुरू राहणार आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

25 तास इतकी चालणार बॅटरी –

यामध्ये, लावा (Lava) प्रोबड्समध्ये 11.6mm ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर्स मीडियाटेक (Airoha) चिपसेट दिला आहे. यानंतर, साईजमध्ये हे इयरबड्स (Earbuds ) लहान दिसत असले तरी, ‘Bass’ बरोबर पॉवरफुल साऊंडचा अनुभव या ,माध्यमातून घेता येतो. यामध्ये 55mAh क्षमतेची बॅटरी (दोन्ही बड्समध्ये वेगवेगळी) दिली गेली आहे. तसेच, याव्यतिरिक्त केसमध्ये 500mAh क्षमतेची बॅटरी मिळते. यावरून, सलग 25 तास म्युझिक ऐकता येऊ शकते असा दावा देखील कंपनीकडून करण्यात आला आहे. तसेच, लावा प्रोबड्सची कामगिरी अतिशय चांगली आहे. यामध्ये प्रीमिअम डिझाईन, सुंदर ब्लॅक कलर आणि जबरदस्त मॅट फिनिश बघायला मिळणार आहे. ग्राहकांकडून अभिप्राय घेतल्यानंतर आणि कानांवर चाचणी घेतल्यानंतरच हे इयरबड्स (Earbuds ) तयार केले जाणार आल्याचे कंपनीने सांगितले आहे.

ऑफरनंतर किंमत किती ?

लावाचे (Lava) नवे इयरबड्स Wake and pair तंत्रज्ञानावर (Technology) आधारित आहेत. चार्जिंग केस उघडल्यानंतर इयरबड्सला (Earbuds ) शक्ती मिळते आणि जोडण्यासाठी ते तयार होतात. यामध्ये Bluetooth v5.0 कनेक्टिव्हीटी आणि म्युझिक कंट्रोलचं फीचर देखील असतं. हे इयरबड्स IPX5 वॉटर आणि स्वेट रेजिस्टेंट आहेत. या इयरबड्स (Earbuds ) बरोबर वॉईस असिस्टंटच देखील फीचर मिळते. या प्रोडक्टसह एका वर्षाची वॉरंटी (Warranty) देण्यात आली आहे. इट्रोडक्टरी ऑफर नंतर (Lava Probud) साठी 2,199 रूपये खर्च करावे लागणार आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : Lava True Wireless Earbuds । lava probuds tws earbuds launched introductory rs 1 price tag sale date features actual price amazon

हे देखील वाचा

Rain Rest | राज्यात आगामी 2 दिवसासाठी हवामान विभागाकडून कोठेही अलर्ट नाही, पावसाची विश्रांती

Pimpri Chinchwad News | भोसरी पोलिसांकडून तिघांना अटक, पिस्तूलासह 4 काडतुसे हस्तगत

Earn Money | कमाईची संधी ! 23 जूनला 290 रूपये लावून तुम्ही बनू शकता लखपती! जाणून घ्या कुठे लावायचा आहे पैसा?

Coronavirus | दिलासादायक ! राज्यातील ‘या’ 15 शहरात एकाही कोरोना रुग्णांचा मृत्यू नाही, आरोग्य विभागाची माहिती