LAVA Z71 ‘दमदार’ बॅटरी सोबत झाला लाँच, रेडमी 8 ला देणार ‘टक्कर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – खूप मोठ्या कालावधीनंतर लावा कंपनीने झेड 71 (Lava Z71) या स्मार्टफोनला भारतात लॉंच केले आहे. कंपनीने यासाठी रिलायन्स जीओशी करार केला आहे. ज्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. फिचर बाबत बोलायचे तर या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर, पावरफुल प्रोसेसर आणि दमदार बॅटरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे हा फोन रेडमी 8 आणि रियलमी 5 सारख्या फोनला चांगलीच टक्कर देऊ शकतो. जाणून घेऊयात या फोनची नेमकी खासियत.

Lava Z71 ची किती असेल किंमत –
कंपनीने दोन जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजने सुरु होणाऱ्या फोनची किंमत केवळ 6,299 रुपये ठेवली आहे. या फोनला फ्लिपकार्ड सारख्या शॉपिंग वेबसाईट वरून देखील खरेदी करता येणार आहे. जिओ ग्राहकांनी या फोनची खरेदी केल्यास त्यांना 1,200 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळणार आहे. हा कॅशबॅक 50 रुपयांच्या 24 वाउचर्सच्या रूपात दिला जाणार आहे. त्या व्यतिरिक्त कंपनीकडून ग्राहकाला 50 जीबी अतिरिक्त डाटा देखील दिला जाणार आहे.

Lava Z71 चे स्पेसिफिकेशन –
कंपनीने या फोनमध्ये 5.7 इंचाचा डिस्प्ले दिला आहे, ज्याचा एस्पेक्ट रेश्यो 19:9 आहे. लावा झेड 71 ला चांगल्या कामगिरीसाठी मीडियाटेक हेलिओ ए 22 एसओसी आणि दोन जीबी रॅमचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये अँड्रॉइड 9.0 पाई ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आलेली आहे. कॅमेर्‍याविषयी सांगायचे तर यात दोन कॅमेरे आहेत, पहिला 13 मेगापिक्सलचा आणि दुसरा 2 मेगापिक्सलचा सेन्सर आहे. याव्यतिरिक्त, 5 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह उत्तम सेल्फी ग्राहकांना यामधून काढता येणार आहे.

Lava Z71 की कनेक्टिविटी आणि बॅटरी –
कनेक्टिविटी लक्षात घेऊन कंपनीने या फोनमध्ये 4 जी एलटीई, वाय – फाय, ब्लूटूथ 5.0, ओटीजी, 3.5 एमएम ऑडियो जॅक आणि यूएसबी पोर्ट सारखे फीचर्स देण्यात आलेले आहेत. त्यासोबत चांगल्या बॅकअपसाठी 3,200 एमएएच ची बॅटरी यामध्ये देण्यात आली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like