Lavanya Tripathi | अभिनेत्री लावण्या त्रिपाठी करणार ‘या’ अभिनेत्यासोबत साखरपुडा; घरच्या घरी करणार समारंभ

पोलीसनामा ऑनलाइन – सध्या सर्वत्र लग्नाचा सिझन सुरु आहे. यामध्येच सोशल मीडियावर दोन सेलिब्रिटींच्या साखरपुडा आमंत्रण पत्रिकेचा फोटो व्हायरल होत आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता वरुण तेज (Actor Varun Tej) आणि अभिनेत्री लावण्या त्रिपाठी (Lavanya Tripathi) हे दोघे उद्या (9 जून) साखरपुडा करतील अशी माहिती समोर येत आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या साखरपुड्याच्या निमंत्रण पत्रिकेचा फोटो व्हायरल झाला आहे. (Varun Tej Lavanya Tripathi Engagement)
एका एलुरु श्रीनू (Eluru Sreenu) या नावाच्या ट्विटर हॅन्डेलवरुन लावण्या आणि वरुण यांच्या साखरपुड्याच्या निमंत्रण पत्रिकेचा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटो खाली टवीट् देण्यात आले आहे, ‘इट्स ऑफिशिअल, वरुण आणि लावण्याला शुभेच्छा’.
पोस्ट करण्यात आलेल्या पत्रिकेत मजुकर ‘दोन ह्रदये, एक प्रेम. मेगा प्रिन्स वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी यांचे अभिनंदन. दोघांनाही शुभेच्छा. साखरपुडा: 9 जून 2023’ असा लिहिलेला दिसत आहे. पत्रिकेवर त्या दोघांचा फोटो देखील टाकण्यात आला आहे. या व्हायरल झालेल्या निमंत्रण पत्रिकेमुळे खरंच लावण्या आणि वरुण (Lavanya and Varun) उद्या (9 जून) साखरपुडा करणार का असा प्रश्न त्यांच्या तमाम चाहत्यांना पडला आहे. वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी यांनी मिस्टर (Mister) आणि अंतरिक्षम (Antariksham) या चित्रपटात काम केलं आहे.
नुकताच अभिनेता वरुण हा इटलीमध्ये व्हेकेशन (Italy Vacation) एन्जॉय करत होता. इटलीतील अनेक फोटो त्याने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. काही रिपोर्टस् नुसार वरुणसोबत अभिनेत्री लावण्या देखील इटलीला फिरायला गेली होती अशी माहिती समोर येत आहे. आता या ट्रीपनंतर दोघे साखरपुड्यासाठी सज्ज झाले आहेत. वरुण आणि लावण्या हे दोघे घरच्या घरी काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा साखरपुडा करणार आहेत. हा साखरपुडा वरुणच्या घरी त्याच्या आई-वडील आणि लावण्यच्या आई-वडिलांच्या उपस्थितीत होणार आहे. या साखरपुड्याला (Lavanya Tripathi Engagement) राम चरण (Ram Charan), उपासना कोनिडेला (Upasana Konidela), साई धरम तेज (Sai Dharam Tej), अल्लू सिरीश (Allu Sirish), सुष्मिता कोनिडेला (Sushmita Konidela), श्रीजा कोनिडेला (Sreeja Konidela), पवन कल्यान (Pawan Kalyan), अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि चिरंजीवी (Chiranjeevi) हे सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
Web Title : Lavanya Tripathi | varun tejs engagement invitation card photo goes viral on social media
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Crime News | धक्कादायक! येरवडा कारागृहात सापडला आणखी एक मोबाईल
Sonakshi Sinha | अभिनयातील ‘अ’ देखील येत नाही…; सोनाक्षी सिन्हावर ‘या’ अभिनेत्रीने केली जहरी टीका