Lavasa City Case | लवासाप्रकरणी न्यायालयात पुन्हा याचिका; अजित पवार म्हणाले पवार कुटुंबावर…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लवासा सिटी प्रकरण (Lavasa City Case) मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) पुन्हा याचिका दाखल करण्यात आली असून, याचिकेस नंबरही मिळाला आहे. त्यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयात ॲड. नानासाहेब जाधव (Adv. Nanasaheb Jadhav) यांनी ही फौजदारी स्वरूपाची याचिका दाखल केली आहे. शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), अजित गुलाबचंद (Ajit Gulabchand) यांच्यासह ज्या अधिकाऱ्यांनी लवासाला (Lavasa City Case) परवानगी दिली त्या सर्वांवर सीबीआयने (CBI) गुन्हे दाखल करून त्याचा तपास करावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (NCP Leadar) यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी याचिकाकर्त्यांना जोरदार टोला लगावला आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

लवासाबाबत (Lavasa City Case) सर्व गोष्टी या पारदर्शक पद्धतीने झाल्या आहेत. प्रसिद्धीसाठी अशा प्रकारचे आरोप केले जातात. त्यांना माहीत आहे पवार कुटुंबावर आरोप केल्यानंतर प्रसिद्धी मिळते. प्रसिद्धी मिळवण्यासाठीच असले आरोप करण्यात आले आहेत. लवासामधील सर्व गोष्टी पारदर्शक असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावेळी दिली.

याचिकाकर्त्यांचा नेमका आरोप कोणता?

लवासाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयात ॲड. नानासाहेब जाधव यांनी ही याचिका दाखल केली आहे.
शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, अजित गुलाबचंद यांच्यासह ज्या अधिकाऱ्यांनी लवासाला परवानगी
दिली त्या सर्वांवर सीबीआयने गुन्हे दाखल करून त्याचा तपास करावा,
अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर नवीन वर्षात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Web Title :- Lavasa City Case | ajit pawars reaction on the petition in lavasa case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | शिंदे गट शिवसेना भवनाचा ताबा घेणार? संजय राऊत म्हणाले -‘एक बाप असेल तर…’

Election Commission Of India | मतदान प्रक्रियेत होणार मोठा बदल; आता देशात कुठेही करता येणार मतदान