गोव्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा,  पोलिसांविरुद्धही गुन्हे दाखल

पणजी वृत्तसंस्था :गोव्यातील वाढती गुन्हेगारी पाहता पर्यटनाचे शहर आता गुन्हेगारांचे शहर बनले आहे. मुरगाव तालुक्यात टॅक्सी चालकाने महिलेवर बलात्कार करणे, जेष्ठ नागरिकांवर सुरी हल्ला करुन त्यांच्या घरातील लाखोंचे एेवज चोरणे, काणकोणमध्ये तर एका पोलिसानेच सरपंचाच्या हाताचा चावा घेणे, पेडण्यात पर्यटकाला पोलिसांनी बेदम मारहाण करणे, त्यामध्ये पोलिसाला अटक होणे. या सर्व घटनावरून गोव्यात कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर स्थिती नव्याने निर्माण झाली आहे.
गोवा विधानसभा अधिवेशनाला येणाऱ्या 19 तारखेपासून सुरूवात होत आहे. एकंदर या सर्व घटनावरुन विरोधी पक्ष काॅंग्रेसला चांगलाच मुद्दा मिळाला आहे. अघविशनात काॅंग्रेस भाजपला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. या घटनांच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नुकतीच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. मटका जुगार व अन्य गैरव्यवहारांविरुद्ध कारवाई केली जावी. तसेच पोलीस बंदोबस्त काही भागांमध्ये वाढविला जावा, अशा सूचना गृह खाते सांभाळणा-या मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना केल्या आहेत.
[amazon_link asins=’B01BJZ3H7W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’911e3a63-7e9e-11e8-b3f6-59531465a12a’]
तसेच राज्यातील वाढत्या अंमली पदार्थाच्या अवैध व्यावसायाची देखील जोरात चर्चा सुरू आहे. आम्ही सगळेच अंमली पदार्थ व्यवहारांना आळा घालण्यात अपयशी ठरल्याचे खुद्द पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनीच सोमवारी पणजीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे. मटका जुगारापेक्षाही गोव्यात अंमली पदार्थ विक्रीचा धंदा ही फार मोठी व गंभीर गोष्ट असल्याचे मंत्री आजगावकर म्हणाले. गोव्यातील वाढत्या ड्रग्ज व्यवहारांविरुद्ध काँग्रेसचे आमदार दयानंद सोपटे यांनीही चिंता व्यक्त केली आहे.
पर्यटन राज्य म्हणून गोव्याची एक वेगळीच अोळख आहे. मात्र राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडणे हे पर्यटन व्यावसायासाठी धोकादायक आहे.  एका टॅक्सी चालकाने महिलेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्याची घटना घडली. पोलिसांनी आरोपीस अटक करण्यात यश मिळविले. त्यानंतर लगेच गिरदोली-चांदोर येथे चोरट्यांनी एका घरातील ज्येष्ठ नागरिकांवर सुरी हल्ला करून त्यांच्या घरातील ऐवज लुटण्याची घटना घडली. या प्रकरणीही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले. पेडण्यात सोमवारी एका पर्यटकाला पोलिसाने व त्या मित्राने मिळून बेदम मारहाण केली. याबाबत पोलिसाला अटक झाली आहे. गेल्या चार दिवसांत दोघा पोलिसांना दोन वेगवेगळ्य़ा गुन्ह्यांत अटक झाल्यामुळे पोलीस दलात देखील मोठी खळबळ उडाली आहे.