‘हे’ 16 कायदेशीर अधिकार जे प्रत्येक भारतीयाला माहिती असणं अत्यंत आवश्यक, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत लोकशाही देश आहे. त्यामुळे प्रत्येकाला संविधानिक अधिकार आहेत. म्हणूनच आपले अधिकार, हक्क आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. यामुळे अनेकदा येणाऱ्या समस्या, भ्रष्टाचार आणि फसवणूकीपासून तुमची सुटका होऊ शकते. त्यामुळे हे अधिकार माहित असणे आवश्यक आहे.

1. तुम्हाला एलपीजी गॅस कनेक्शनसोबत 40 लाख रुपयांचा विमा मिळतो, जर तुमच्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला तर तुम्हाला 40 लाख रुपयांची नुकसान भरपाई देखील दिली जाते.

2. जर तुम्ही कंपनीने दिलेल्या भेटवस्तुंचा स्वीकार करत असाल तर एखादी व्यक्ती तुमच्यावर लाच घेतल्याचा आरोप लावू शकतात. आजकाल कंपन्या लोकांना भेटवस्तू देत असतात, परंतु सरकारद्वारे ही परंपरा बंद करण्यासाठी 2010 मध्ये एक कायदा बनवला गेला आहे आणि त्या कायद्यानुसार जर तुम्ही कंपनीकडून कोणत्याही प्रकारची भेटवस्तू स्वीकारली तर तुम्ही लाच स्वीकारली असे मानले जाईल आणि तुमच्यावर कारवाई करण्यात येऊ शकते.

3. महिलांना अटक करण्यासाठी विविध नियम आहेत, ज्यात एक महिला आरोपीला पोलीस स्टेशन मध्ये नेण्यासाठी दुसरी महिला पोलीस कर्मचारी हवी. महिला पोलीस कर्मचाऱ्याशिवाय एखाद्या महिलेला पोलीस अटक करु शकत नाहीत. जर असे केल्यास तो गुन्हा ठरतो. तसेच एखाद्या महिला आरोपीला पोलीस संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत अटक करु शकत नाहीत. असे जर एखाद्या महिलेबाबत घडत असेल तर ती अटक होण्यास नकार देऊ शकते.

4. आयकर अधिकाऱ्यांकडे तुम्हाला अटक करण्याचा अधिकार असतो जर तुम्ही कर भरला नसेल तर टीआरओला (टॅक्स रिकव्हरी ऑर्गनायजेशन) तुम्हाला अटक करण्याचा अधिकार आहे. त्यांच्याच परवानगीने तुम्ही तुरुंगातून बाहेर येऊ शकतात. या नियमाचा उल्लेख 1961 च्या आयकर कायद्यात करण्यात आला आहे.

5. सायकल चालवण्यावर मोटर वाहन अॅक्ट लागू होत नाही. त्यामुळे तुम्ही सायकल चालवत असाल तर तुम्हाला कोणतीही काळजी करण्याची आवश्यकता नाही. या कायद्यांतर्गत सायकल आणि रिक्षा येत नाहीत.

6. आपला समाज लिव्ह इन रिलेशनशिपला अशा नजरेने पाहतो की तो एखादा गुन्हा असावा. असे असेल तरी कायदेशीर पद्धतीने हा कोणताही गुन्हा नाही. यात आणखी महत्वपूर्ण बाब म्हणजे या नात्यातून एखादे मुल जन्माला आल्यास आई वडीलांच्या संपत्तीवर त्याचा पूर्ण अधिकार असेल.

7.  राजकीय पक्षांना निवडणूकीत वाहन भाड्याने घेण्याचा अधिकार असतो, जर तुम्ही तुमचे वाहन देण्यास तयार असाल तर तुम्ही निवडणूक काळात तुमचे वाहन भाड्याने देऊ शकतात.

8. सध्या देशात वाहतूक नियमांमुळे लोक वैतागले आहेत. दंडाची रक्कम वाढवल्याने लोक सावध झाले आहेत. अनेकांना जास्त रक्कमेचे दंड भरावे लागले. वाहतूकीच्या नियमांनुसार वाहतूकीचा तुम्ही एखादा नियम मोडल्यास दिवसाला तुम्हाला एकदाच दंड ठोठावला जाऊ शकतो. त्याच दिवशी तुम्हाला दुसरा दंड ठोठावण्यात येऊ शकत नाही. जर तुमच्यावर एकदा हेल्मेट न घातल्याचा दंड लावण्यात आला तर त्यानंतर तुम्ही दिवसभर हेल्मेट विना फिरु शकतात.

9. तुमच्याकडे वस्तुची किंमत कमी करण्याचा अधिकार असतो. तुम्ही दुकानदाराकडून वस्तुची किंमत कमी करुन घेऊ शकतात. उदाहरणार्थ एखादी वस्तू 100 रुपयांची असेल तर तुम्ही 90 रुपयात ती विकत घेऊ शकतात.

10. एखादी व्यक्ती तुमच्याकडून घेतलेले उधार पैसे परत करत नसेल तर तुम्ही त्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करु शकतात.

11. सार्वजनिक जागेवर एखादा व्यक्ती अश्लील कृत्य करत असेल तर तीन महिन्यांची शिक्षा होऊ शकते.

12. पोलीस हेड कॉस्टेंबल अशा कोणत्याही गुन्ह्याला तुम्हाला दंड ठोठावू शकत नाही जे दंड 100 रुपयांपेक्षा अधिक असतील. तर तुम्ही एकापेक्षा अधिक नियमांचे उल्लंघन केले तर तुम्हाला दंड होऊ शकतो.

13. 1861 च्या पोलीस कायद्यानुसार भारतातील प्रत्येक राज्यातील पोलीस अधिकारी नेहमी ड्यूटीवर असेल. जर मध्यरात्री कोणतीही घटना घडली तर त्या ठिकाणी पोलिसांना तात्काळ हजर रहावे लागेल. पोलीस कायद्यानुसार पोलीस अधिकारी विना वर्दीत देखील ड्यूटीवर असू शकतात.

14. 1956 मध्ये तयार करण्यात आलेल्या हिंदू दत्तक आणि देखभाल कायद्यानुसार जर तुम्ही हिंदू धर्माचे असाल आणि तुम्हाला एक मुल असेल तर तुम्ही दुसरे मुल दत्तक घेऊ शकत नाहीत. जर तुम्हाला मुल नसेल तरच तुम्ही मुल दत्तक घेऊ शकतात. तुमच्या आणि बाळाच्या वयात 21 वर्षांचे अंतर हवे.

15. जर पती पत्नीत लैंगिक संबंध चांगले नसतील तर दोघे हे कारण सांगून घटस्फोट घेऊ शकतात.