धक्कादायक ! महिला पोलिसाला अंमली पदार्थ देवुन वकिलानं साथीदारासह केला सामुहिक ‘बलात्कार’, अश्लील फोटोनं केलं ‘ब्लॅकमेल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशात नोएडामध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर सामुहिक बलात्काराची घटना झाली. महिला पोलीस कर्मचाऱ्याने या प्रकरणी एक वकील आणि त्याच्या मित्रावर आरोप लावला आहे. ज्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले की आरोपींनी तिचे अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल देखील केले आहे.

काय आहे हे प्रकरण
माहितीनुसार नोएडा भागातील महिला पोलीस कर्मचाऱ्यावर मेरठच्या शोभापूरमध्ये राहणाऱ्या एका वकिलाच्या आणि त्याच्या मित्राच्या विरोधात नशेचे पेय पाजून सामूहिक बलात्कार आणि अश्लील व्हिडिओ तयार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीत सांगण्यात आले की आरोपीनी सामूहिक बलात्काराचा व्हिडिओ देखील तयार केला आहे. आरोपी हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी महिलेला देत होते.

या घटनेनंतर खळबळ माजली. नोएडा पोलिसांनी तक्रार दाखल तर कारवाईस सुरुवात केली आहे, पोलिसांनी सांगितले की न्यायालयाच्या आदेशाने एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांद्वारे पोलीस ठाणे बीटा – 2 मध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत प्राथमिक दृष्ट्या आरोपाचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी निष्पक्ष विचार करण्यात येईल.

Visit : Policenama.com