शेतकरी आंदोलन : वकिलाची आत्महत्या, ‘मन कि बात’ विरोधात थाळीनाद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय कृषी कायद्यांवरून सरकार व शेतकरी संघटनांमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांनी स्वतःच्या रक्ताने पत्र सरकारला लिहिली होती. त्यालाही कोणताच प्रतिसाद मिळाले नाही.

आंदोलन चिघळत चालले असून शेतकऱ्यांच्या समर्थनात हरयाणातील बहादूरगडमधील
वकिलाने आत्महत्या केल्याने आंदोलनस्थळी खळबळ उडाली. अमरजीत सिंह असं त्यांच नाव आहे. रोहतकमधील सरकारी रूग्णालयात त्यांना मृत घोषीत करण्यात आले. आंदोलनात सहभागी झालेल्या वकिलाने आत्महत्या केल्याने रोष अजूनच वाढला. अमरजीत सिंह जलालाबादचे रहिवासी आहेत. शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी बलिदान देत असल्याचे त्यांच्याजवळ सापडलेल्या चिठ्ठीत लिहिले होते. मन की बात करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी थाळी वाजवली. तुमची मनकी बात सांगण्याऐवजी आमची मनकी बात ऐका, अशी टीका किसान संघटनेेचे गौतम सिंह यांनी केली.

राकेश टिकैत यांच्याभाेवती कडे
शेतकरी संघटनांचे प्रमुख राकेश टिकैत यांना जीवे मारण्याची धमक्या येत असल्यानेही शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. आंदोलनस्थळी त्यांच्याभोवती शेतकरी कडे करून उभे राहतात. पोलिसांनी धमकी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, ऑल इंडिया किसान संघर्ष समन्वय समितीने देशव्यापी संघर्षाची हाक दिली आहे. शेतकऱ्यांना मंगळवारी (२९ डिसेंबर) निदर्शने करण्याचे केले आहे.