विधी पदवीधर नसताना तब्बल 18 वर्षे केली वकिली

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – विधी पदवीधर नसताना बनावट कागदपत्रांच्या आधारे वकिलीची सनद घेतली. त्यानंतर तब्बल 18 वर्षे उच्च न्यायालय व नगरसह राज्यभरातील विविध न्यायालयांमध्ये वकिली केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मंगलेश भालचंद्र बापट या तोतया वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाने आज दुपारी दिले आहेत

याबाबत समजलेली माहिती अशी की, मगंलेश बापट यांनी अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एस. आर नावंदर साहेब यांचे कोर्चात अटकपूर्व जामीन रद्द होणेबाबत अर्जदार नागेश मारूती मेगडे यांच्यावतीने अटकपूर्व जामीन अर्ज रद्द करणेकामी न्यायालयात
अर्ज केला होता. सदरच्या अर्जामध्ये युवराज हनुमत नवसरे यांनी न्यायालयात अर्ज करून मंगलेश बापट हे वकील नसतांनाही त्यांनी अर्जदाराच्यावतीने वकीलपत्र दाखल केलेबाबत तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये मंगलेश बापट ही व्यक्ती वकिल नसतानाही त्यांनी सन २००१ सालापासून वेगवेगळया न्यायालयात व उच्च न्यायालयात वकिल म्हणून काम पाहिल्याबाबत तक्रार केलेली होती.

न्यायालयाने पोलीस अधिक्षक अहमदनगर यांनी मंगलेश बापट यांच्या वकिलीची सनद व सनद मिळण्यासाठी दाखल केलेल्या कागदपत्रांची सत्यता पडताळण्यासाठी दि. २४/१०/२०१८ रोजी आदेश दिलेले होते. त्या आदेशानुसार पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण व तपासी अधिकारी श्री. एस.पी. माने यांनी याबाबत सविस्तर चौकशीकरून मा. न्यायालयात तसा अहवाल सादर केलेला होता. त्यावर आज रोजी न्यायालयात सुनावणी होऊन सदरची मंगलेश बापट यांनी मिळविलेली वकिलीची सनद व त्या संदर्भात दिलेली कागदपत्रे ही बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

न्यायालयाने आज (दि. २2) रोजी अॅड. वाय.जी. सुर्यवंशी व अॅड. जे. डी. पिसाळ व सरकारी पक्षाच्यावतीने अति. सरकारी अभियोक्ता अनिल ढगे यांचा युक्तीवाद ग्राहय धरून न्यायालयाने पोलीस निरीक्षक कर्जत पो.स्टे. यांना मंगलेश भालचंद्र बापट यांच्याविरूध्द वकिलीची बनावट सनद व खोटी कागदपत्रे तयार करून लोकांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहे.

सदरच्या आदेशाची प्रत पुढील कार्यवाहीसाठी बार कॉन्सील ऑफ महाराष्ट्र अँण्ड गोवा, बार कॉन्सील ऑफ मध्य प्रदेश, जबलपुर व बार कॉन्सील ऑफ इंडिया यांच्याकडे पाठविण्याचे आदेश दिले. तसेच सदर आदेशाची प्रत जिल्हा पोलीस अधिक्षक
अहमदनगर यांनाही पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्याचे आदेश दिलेले आहे.