एकत्र आले IPS, लिहीलं – ‘वेळ आली आहे की वकिलांनी ‘कायदा’चं शिकावं’

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीमध्ये तीस हजारी कोर्टाच्या परिसरात पोलीस आणि वकिलांमध्ये चांगलाच वाद उफाळून आला. दिल्ली नंतर देशाच्या अनेक भागांमध्ये याबाबतचे पडसाद देखील पहायला मिळाले. वकिलांकडून पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्यामुळे आता आयपीएस अधिकाऱ्यांनी याबाबत आवाज उठवला आहे आणि आपली बाजू सर्वांसमोर मांडली आहे.

कोणी नेमकं काय लिहिलं ?
IPS असलम खान यांनी एका ट्विटला ‘आम्ही पोलिसांसोबत आहोत’ हा हॅशटॅग लिहून रीट्विट केले आहे. त्यात असे देखील लिहिले आहे की, आमचे देखील काही अधिकार आहेत त्यामुळे तुम्हाला आमचे देखील ऐकावे लागेल आणि जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत निर्दोष असल्याचा नियम सगळ्यांवर लागू होतो.

https://twitter.com/aslam_IPS/status/1191447501024514048

IPS सागर हुड्डा यांनी देखील याबाबत भाष्य केले आहे. त्यांनी लिहिले की, कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही जर कोणी गुंडागर्दी करत असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे मग तो वकील का असेना. वेळ आली आहे की वकिलांनी सुद्धा कायदा पाळावा

IPS अधिकारी मधुर वर्मा ने बाहेरील घटनेचा उल्लेख करत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि त्या सोबत लिहिले आहे की, आम्हाला माफ करा, आम्ही पोलीस आहोत, आम्हाला कोणतेही कुटुंब नाही आणि आमच्यासाठी कोणताच मानवाधिकार नाही.

कर्नाटकच्या IPS डी रूपा यांनी लिहिले आहे की, ही सिस्टीमची थट्टा आहे. मी फक्त एव्हढच आवाहन करू शकते की यातील गुन्हेगारांना कडक शिक्षा झाली पाहिजे.

दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाच्या बाहेर वकील आणि पोलिसांमध्ये झालेल्या भांडणानंतर साकेत आणि कड़कड़डूमा न्यायालयाच्या बाहेर असलेल्या पोलिसांना देखील वकिलांनी मारहाण केली होती. फक्त दिल्लीच नाही तर उत्तर प्रदेशात देखील अशा घटना घडल्याचे समोर आले होते.

Visit : Policenama.com