चिंचवडमधून भाजपचे लक्ष्मण जगताप विजयी

चिंचवड : पोलिसनामा ऑनलाइन – चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपच्या लक्ष्मण जगताप यांनी अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा पराभव केला. सलग दोन वेळा विजय मिळवलेल्या लक्ष्मण जगताप यांच्यासाठी हि प्रतिष्ठेची निवडणूक असून राहुल कलाटे यांनी विजयासाठी जोर लावला होता. मात्र अखेर जगताप यांना आपला किल्ला राखण्यात यश आले.

या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेने आपला उमेदवार न देता अपक्ष राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे या निवडणुकीत सर्वच पक्षांनी कलाटे यांच्या विजयासाठी जोर लावला होता. मात्र विरोधकांची जादू थोडी फिली पडल्याने त्यांना विजय मिळवणे अवघड गेले. मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या जगताप यांच्यासाठी हा विजय फार मोठा असून यावेळी त्यांना मंत्रिपदाचा प्रबळ दावेदार देखील मानण्यात येत आहे.

उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते चिंचवड मतदार संघ –
1. जगताप लक्ष्मण पांडुरंग (भाजप) – 150723
2. राजेंद्र माणिक लोंढे (बहुजन समाज पार्टी) – 3954
3. एकनाथ नामदेव जगताप (बहुजन मुक्ती पार्टी) – 569
4. छायावती चंद्रकांत देसले (पॅरेंटस् अ‍ॅन्ड वर्कर पार्टी ऑफ इंडिया)- 569
5. नितेश दगडू लोखंडे (जनहित लोकशाही पार्टी) – 725
6. महावीर उर्फ अजित प्रकाश संचेती (भारतीय राष्ट्रवादी पार्टी) – 903
7. कलाटे राहुल तानाजी (अपक्ष) – 112225
8. डॉ. मिलींदराजे दिगंबर भोसले (अपक्ष) – 498
9. रविंद्र विनायक पारधे (सर) – (अपक्ष) – 1475
10. राजेंद्र मारूती काटे (पाटील) – 332
11. सुरज अशोकराव खंदारे (अपक्ष) – 384
12. नोटा – 5874

Visit : Policenama.com