Laxman Mane | ‘कंगना रणौत, विक्रम गोखले, अवधूत गुप्ते भाजपचे पपेट’ !; ‘या’ लेखकाची जोरदार टीका (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिने काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केले होते. तिच्या या वक्तव्याचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी समर्थन केले होते. त्यावरून राज्यात नव्या वादाला तोंड फुटले होते. कंगनाच्या या वक्तव्यावर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या वादात आता सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक लक्ष्मण माने (Laxman Mane) यांनी उडी घेतली आहे. कंगना रणौत, विक्रम गोखले आणि अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) अशा व्यक्तींच्या देशविरोधी वक्तव्यांची गंभीर दखल घेऊन केंद्र सरकार देशद्रोहाचा (Sedition) गुन्हा (Crime) दाखल करणार की त्यांच्या बोलण्याची किंमत म्हणून आणखी मोठे सन्मान बहाल केले जाणार ? सरकार गुन्हे दाखल करणार नसेल, तर भाजप (BJP) सरकारनेच पेरलेले हे पपेट आहेत, असे समजण्यास हरकत नाही, अशी जळजळीत टीका लक्ष्मण माने (Laxman Mane) यांनी केली आहे.

देशाला 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळाले, असे म्हणणे हा राज्यघटना नाकारण्याचा प्रकार आहे. रानडे, गोखले, टिळक, गांधी, सावरकर, बोस, भगतसिंग अशा अनेकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. सत्तेतील विचारधारेची मंडळी तेव्हा इंग्रजाच्या बाजूने उभी होती. देशाला मिळालेले स्वातंत्र्य या मंडळींना मान्य नाही. या लोकांसाठी नागपूरला (Nagpur) संहिता तयार केली जाते. कंगना, गोखले, गुप्ते यांना राज्यघटनेमुळे बोलण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे; ते घटनेचा रोज अपमान करत आहेत, अशी टीका लक्ष्मण माने (Laxman Mane) यांनी केली आहे.

 

आंदोलनाचा दिला इशारा

स्वातंत्र्य, देशाचे सार्वभौमत्व आणि लोकशाही यासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांचा कंगना, गोखले आणि गुप्ते यांनी अवमान केल्याबद्दल त्यांच्याविरोधात देशद्रोहाची तक्रार दाखल करण्यात येणार आहे. गोखले आणि गुप्ते यांनी आठवडाभरात देशाची माफी न मागितल्यास त्यांच्या घरासमोर सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल तसेच त्यांना घराबाहेर पडू दिले जाणार नाही असा इशाराच लक्ष्मण माने (Laxman Mane) यांच्याकडून देण्यात आला आहे.

 

Web Title :- Laxman Mane | kangana ranaut vikram gokhale and avadhoot gupte are the puppet of bjp says laxman mane

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Anil Parab | खासगीकरणावर अनिल परबांची माहिती; म्हणाले – ‘एसटी कामगारांसोबत लोकांचीही जबाबदारी राज्य सरकारवर’

Virat Kohli | डिव्हिलियर्सच्या निवृत्तीवर विराट कोहलीने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…

Sharad Pawar | ‘…त्यामुळे महाविकास आघाडी भक्कम होतेय’ – शरद पवार