ट्रोलरनं ट्विंकल खन्नाचा फोटो एडिट करत लिहिलं ‘Twinkle Bomb’ ! अभिनेत्रीनं केली बोलती बंद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्या लक्ष्मी (Laxmmi) या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. विविध कारणांनी हा सिनेमा वादात सापडताना दिसत आहे. सिनेमात अक्षयनं आसिफ नावाची भूमिका साकारली आहे. यावरून अनेकांनी सिनेमाला विरोध केला आहे. सिनेमाच्या टायटलवरून ही बराच राडा झाला आहे. यानंतर सिनेमाचं लक्ष्मी बॉम्ब हे नाव बदलून या नावातून बॉम्ब शब्द काढण्यात आला आहे. असं असलं तरी अद्यापही हा वाद निवळलेला नाही. यावरून अक्षय कुमारला ट्रोल केलं जात आहे. इतकंच नाही तर अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) हीदेखील ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. परंतु तिनं याला जशास तसं उत्तर देत बोलती बंद केली आहे.

एकानं फोटोशॉप करत ट्विंकल खन्नाचा फोटो लक्ष्मी सिनेमाच्या पोस्टरवर फिट केला आहे आणि त्याला ट्विंकल बॉम्ब ((Twinkle Bomb) असं टायटल दिलं आहे. आता या फोटोवर लक्ष गेल्यावर ट्विंकल कुठे शांत बसणार आहे. हे मीम शेअर करत तिनं संताप व्यक्त केला आहे.

फोटोशॉप केलेला फोटो शेअर करत ट्विंकलनं लिहिलं की, एका ब्लॉगसाठी फोटो शोधत असताना माझी नजर या फोटोवर गेली. रिपोस्ट करण्यापेक्षा मी तो क्रॉप करून शेअर करत आहे. तुम्ही देवाला थट्टेचा विषय बनवले. तू आमच्या देवावर विनोद केलास. तू थर्ड क्लास व्यक्ती आहेस असं एकानं मला म्हटलं. यावर मी त्याला उत्तर दिलं की, देवाला खरोखरच विनोद आवडत असतील. असं नसतं तर त्यानं तुला (ट्रोलर) का बनवलं असतं ?

ट्विंकलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं अनेक सिनेमात काम केलं आहे. सध्या ती सिनेमात जरी दिसत नसली तरी लेखिका म्हणून आज तिची वेगळी ओळख आहे. अभिनेत्री म्हणून तिला फार यश कमावता आलं नाही. बरसात या सिनेमातून तिनं आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. यानंतर तिनं बादशाह, मेला अशा अनेक सिनेमात काम केलं आहे.