‘खिलाडी’ अक्षयचा Laxmii ठरला ‘फुसका’ ! सोशल मीडियावर मीम्सचा पूर

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचा बहुचर्चित सिनेमा लक्ष्मी (Laxmii) हा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. परंतु चाहत्यांना हा सिनेमा फारसा भावला नसल्याचं दिसत आहे. अनेकांनी सिनेमाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सिनेमा पाहून वेळ वाया घालवल्यासारखं वाटत असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. त्यातच आयएमडीबी (IMDb) रेटिंगवरदेखील लक्ष्मी अपयशी ठरला आहे. सिनेमाला 10 पैकी 2.6 रेटिंग मिळाली आहे. कंचना (Kanchana) या मूळ तमिळ सिनेमाचा तो रिमेक आहे. काहींनी म्हटलं आहे की, कंचना हा लक्ष्मीपेक्षा जास्त चांगला आहे.

https://twitter.com/JoshiAadish/status/1326012528393138176?s=20

सिनेमा रिलीज झाल्यानंतर आता सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला आहे. एका यूजरनं मिर्झापूर 2 चा एक सीन शेअर करत लिहिलं आहे की, अक्षय कुमारचा लक्ष्मी सिनेमा पाहून झाल्यावर लोक म्हणतात, आम्हाला तुमच्याकडून जास्त अपेक्षा होत्या. एकानं तर आयुष्मान खुराना, विकी कौशल, शाहिद कपूर, वरुण धवन आणि टायगर श्रॉफ हे अक्षय कुमारला उचलून नेत आहेत असं दाखवलं आहे. एका यूजरनं तर डोळ्यांत चक्क टॉयलेट क्लीनर घालतानाचा फोटो शेअर केला आहे. आणि कॅप्शनमध्ये म्हटलं हे की, लक्ष्मी पाहिल्यानंतर.

या सिनेमात अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत आहेत. त्यांची जोडीही अनेकांना साजेशी वाटत नाही. त्यांच्या वयातील तफावत लगेच जाणवत आहे. शरद केळकर यानं साकारलेल्या भूमिकेसाठी मात्र प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.

https://twitter.com/bhakt_saffron/status/1325978698521063424?s=20