‘लक्ष्मी बॉम्ब’चे टायटल बदलण्याची मागणी, हिंदू सेनेचा ‘लव्ह जिहाद’ला प्रमोट करण्याचा आरोप

नवी दिल्ली : अभिनेता अक्षय कुमारचा चित्रपट लक्ष्मी बॉम्बवरून वाद निर्माण झाला आहे. संपूर्ण देशात अनेक संघटनांनी हा चित्रपट बॅन करण्याची मागणी केली आहे. कुणाला चित्रपटाच्या टायटलचा त्रास होत आहे, तर कुणाला चित्रपटाचा कंटेटसुद्धा धार्मिक भावनांना धक्का पोहचवणारा वाटत आहे. आता राष्ट्रीय हिंदू सेनेने सुद्धा चित्रपटाविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे.

हिंदू सेना लक्ष्मी बॉम्बच्या विरूद्ध आक्रमक
राष्ट्रीय हिंदू सेनेकडून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून लक्ष्मी बॉम्ब बॅन करण्याची मागणी केली आहे. पत्रात इशारा दिला आहे की, जर चित्रपटाचे नाव बदलले नाही तर प्रत्येक चित्रपट गृहाच्या बाहेर विरोध प्रदर्शन करू. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ट्विटमध्ये लिहिले आहे की – हिंदू सेनेने प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहिले आहे. आम्ही मागणी केली आहे की, लक्ष्मी बॉम्बचे निर्माते, कास्टच्याविरूद्ध अ‍ॅक्शन घेतली जावी कारण चित्रपटाद्वारे हिंदू देवी लक्ष्मीचा अपमान करण्यात आला आहे.

कशावरून आहे वाद
पत्रात म्हटले आहे की, निमिर्त्यांनी हिंदू समाजाला भडकवण्यासाठी चित्रपटाचे नाव लक्ष्मी बॉम्ब ठेवले आहे. त्यांच्यानुसार लक्ष्मीच्या पुढे बॉम्ब शब्द लाणे योग्य नाही. ज्या लक्ष्मीची पूजा केली जाते, सन्मान केला जातो, त्यांच्या नावासमोर बॉम्ब लावणे निंदनीय आहे. हिंदू सेनेकडून यावर जोर सुद्धा देण्यात आला की, अक्षयचा चित्रपट लक्ष्मी बॉम्ब लव्ह जिहादला प्रोत्साहन देत आहे. चित्रपटात हिंदू मुलाचे मुस्लिम मुलीवर प्रेम दाखवण्यात आले आहे. याच आधारावर हिंदू सेनेकडून रिलिजपूर्वी चित्रपटाचे नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. तर सर्व हिंदू समाजाला आवाहन केले आहे की हा चित्रपट बायकॉट करावा.

अक्षय कुमारचा चित्रपट लक्ष्मी बॉम्ब 9 नोव्हेंबरला ओटीटीवर रिलिज होणार आहे. चित्रपटात अक्षयशिवाय कियारा आडवाणीची सुद्धा महत्वाची भूमिका आहे. चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा ट्रेंड करत आहे. अक्षयचा लुक सुद्धा जबरदस्त क्रिएट होत आहे. अशावेळी चित्रपट शांततेत रिलिज होणार किंवा नाही, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

You might also like