साडूवर खुनी हल्ला करणाऱ्यास ‘एलसीबी’कडून अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शेजारी राहणाऱ्या साडूवर खुनी हल्ला करणाऱा संतोष ज्ञानदेव वाजे  (वय ४०, रा. वडनेर हवेली, निघोज, ता. पारनेर) या पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील राक्षेवाडी येथून अटक केली. चार महिन्यानंतर तो पोलिसांच्या हाती लागला. स्थानिक गुन्हे शाखेने आज त्यांच्या अटकेची कारवाई केली.

संदीप जयवंत मुळे (वय २९, रा. देवीभोयरे, ता.पारनेर) हे जखमीचे नाव आहे. त्यांनी पारनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती की, वाजे हा साडू असून शेजारी राहत आहेत. त्याने 19 ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. तळयाजवळ दारुच्या नशेत फिर्यादीस विनाकारण शिवीगाळ केली. फिर्यादी हे  घरासमोर पत्नीसह उभे होते. त्यावेळी मुळे यांनी सकाळी विनाकारण शिवीगाळ का केली, असे विचारले असत त्यास त्याचा राग आला. शिवीगाळ, दमदाटी करुन मोटारसायकलला लावलेला कोयता काढून फिर्यादीचे डाव्या हातावर मनगटावर, बोटांवर मारुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

तसेच फिर्यादीची पत्नी अरुणा संदीप मुळे ही सोडविण्यास मध्ये आली असता तिस आरोपीने कोयत्याने दोन्ही हातांवर, कंबरेवर पाठीवर कोयत्याने मारुन, गंभीर दुखापत करुन, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन पारनेर पोलीस स्टेशन येथे भादवि कलम ३०७, ३२६, ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झालेपासून आरोपी फरार होता. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी स्थानिक गुन्हे शाखा व पारनेर पोलीस स्टेशन गुन्हयाबाबत यांना सदर योग्य त्या सुचना दिल्या होत्या.

तपासा बाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकातील पोसई फडतरे, पोहेकॉविजयकुमार वेठेकर, फकिर शेख, विष्णु घोडेचोर, दिनेश मोरे, रविंद्र कर्जुले, विजय ठोंबरे, रविकिरण सोनटक्के, दिपक शिंदे समांतर

तपास करीत असताना गोपनिय माहीती मिळाली कि, सदरच्या गुन्हयातील आरोपी नसंतोष ज्ञानदेव वाजे हा राक्षेवाडी, ता. राजगुरुनगर जि. पुणे येथे असल्याची खात्रीशीर मिळाल्याने सदर ठिकाणी सापळा लावुन आरोपीस पकडले.