स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला अटक

पुणे (लोणी काळभोर) : पोलीसनामा ऑनलाईन – स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना एका खबऱ्याकडून बातमी मिळाली की, शिरूर पोलीस स्टेशन मध्ये चोरीच्या गुन्ह्यात आवश्यक असलेला फरारी आरोपी वाघोलीत येणार आहे. यातील फिर्यादी नामे सुरज राजाराम बांदल कर्डे गावचे सरपंच यांचेवर जबरी चोरी करण्याचे उद्देशाने प्राणघातक हल्ला झाला होता. त्यामध्ये ते जखमी झाले होते. त्याचे प्रमाणे यातील फिर्यादी यांनी आरोपी यांना प्रतिकार केल्यामुळे यातील एक आरोपी व फिर्यादी जखमी झाले होते. यातील जखमी अवस्थेतील फिर्यादी, ग्रामस्थ व पोलीस यांनी एका आरोपीचा पाठलाग करून आरोपीस अटक केली होती.

त्याच प्रमाणे दुसरा आरोपी नामे अमोल विश्वास ओव्हाळ रा. वृंदावन, रामनगर, पेरणेफाटा, ता. हवेली जि. पुणे हा पळुन गेला होता. सदर आरोपी हा वाघोली परिसरात येणार असल्याची माहीती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीसांना मिळाली होती, गुन्ह्यातील पाहीजे असलेले आरोपी नामे अमोल विश्वनाथ ओव्हाळ रा. वृंदावन, रामनगर, पेरणेफाटा, ता. हवेली जि. पुणे हा वाघोली परिसरात येणार असल्याची माहीती मिळाली. सदर बातमीचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना, उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीमती ऐश्वर्या शर्मा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेतील सहा.पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोलीस उप-निरीक्षक अमोल गोरे, सहा.पोलीस फौजदार दत्तात्रय गिरमकर, पोलीस हवालदार उमाकांत कुंजीर, सचिन गायकवाड, पोलीस नाईक विजय कांचन, राजु मोमीन, जनार्दन शेळके, पोकाॅ धिरज जाधव, बाळासाहेब खडके, चा.पो.काॅ.अक्षय जावळे यांचे पथक कारवाईकामी रवाना केलेले होते.

सदरचे पथक वाघोली परिसरात सापळा रचुन थांबलेले असताना, एक इसम अंगामध्ये टि-शर्ट आणि जिन्स पॅन्ट परिधान केलेला अंदाजे 37 वर्ष वयाचा इसम आला त्यानंतर बातमीदाराने त्याचेकडे बोट दाखवून व तसा इशारा करून सदर इसम हा तोच असल्याचे सांगितले. पथकाने त्यास पाहून त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता, तो पळून जावू लागला. त्याचा पाठलाग करून त्यास झडप घालुन पथकाने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेनंतर त्यास त्यांचे नाव, पत्ता विचारता, त्यांने त्याचे नाव अमोल विश्वास ओव्हाळ रा. वृंदावन, रामनगर, पेरणेफाटा, ता. हवेली जि. पुणे असे सांगितले. त्यास पुढील कारवाईकामी शिरूर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे. हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर वेगवेगळ्या पोलिस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहेत.

यात निगडी पोलीस स्टेशन गु.र.नं.39/2003 भादविकाक. 379, 34 वगैरे, भुईंज पोलीस स्टेशन,सातारा गु.र.नं.38/2009 भादविकाक. 399 वगैरे, निगडी पोलीस स्टेशन गु.र.नं.77/09 भादविकाक. 395 वगैरे, शिरूर पोलीस स्टेशन गु.र.नं.400/2010 भादविकाक. 395, 363 वगैरे, हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं.460/2011 भादविकाक 399 वगैरे, चिंचवड पोलीस स्टेशन गु.र.नं.74/2012 भादविकाक. 399 वगैरे, निगडी पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –