पुणे ग्रामीण एलसीबीची मोठी कारवाई ; घरफोडी करणाऱ्या सराईतांना ठोकल्या बेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोणावळा शहरात घरफोडया करणाऱ्या सराईताला पुणे ग्रामीण पोलिसांच्या एलसीबीच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून ३ गुन्हे उघड करत २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

वसीम रुबाबअली शेख ( वय २३ वर्षे रा. न्यु तुंगार्ली रोड, इंदिरानगर, लोणावळा ता. मावळ), वसीम रुबाबअली शेख, (वय २३ वर्षे रा. न्यु तुंगार्ली रोड, इंदिरानगर, लोणावळा ता. मावळ) अशा दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

७ मे रोजी मौजे स्वराजनगर मध्ये अज्ञात चोरट्यांनी बंद खोलीचे बाथरुम मध्ये प्रवेश करत बाथरुम व किचनचा दरवाजा कशाने तरी तोडुन बंद घरात प्रवेश करून एक सोन्याची चैन, सोन्याची अंगठी, एक टेक्नो कंपनीचा मोबाईल फोन, एक एम आय कंपनीचा मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकुण ५४,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता. यावेळी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक करत होते. त्यावेळी बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून त्यांनी सराईत गुन्हेगार वसीम रुबाबअली शेख, याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने ही घरफोडी केल्याची कबुली दिली. दरम्यान त्याच्याकडून या गुन्ह्यातील एकुण २९ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळुन जप्त करण्यात आला. त्याने लोणावळा शहरातील ३ ठिकाणी घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

त्यासोबतच या गुन्ह्यातील एम.आय कंपनीचा मोबाईल व सोन्याची अंगठी रविंद्र दशरथ कालेकर याच्याकडे मिळून आली. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांच्या मार्गदर्शाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या पथकाने केली.