कामशेत येथून ३० किलो गांजा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गस्तीदरम्यान पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने कामशेत येथील बाजारपेठेतील दौंडे कॉलनीत एका घरात छापा टाकून साडेचार लाख रुपये किंमतीचा ३० किलो गांजा जप्त केला आहे. तर याप्रकऱणी एकाला अटकही केली आहे.

महेंद्र शांतीलाल भन्साळी (वय.५०, रा. दौंडे कॉलनी, पवना नगर रोड कामशेत) असे अटक कऱण्यात आलेल्याचे नाव आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कामशेत बाजारपेठ व परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी दौंडे कॉलनीत एका घरात गांजाचे पोते असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा घातला. त्यावेळी त्यांनी पांडऱ्या रंगाच्या एका पोत्यात ३० किलो गांजा मिळून आला.

पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट, कामशेतचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, उपनिरीक्षक जीवन राजगुरु, सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, दत्तात्रय जगताप, कर्मचारी प्रकाश वाघमारे, अजय दरेकर, समीर शेख, गणेश महाडिक, वैभव सपकाळ, संदिप शिंदे, अक्षय जावळे यांच्या पथकाने केली.