मूर्ती लहान पण किर्ती महान, 23 वर्षीय युवकाकडून चीनच्या नाकात ‘दम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हॉंगकॉंग शहरातील तेवीस वर्षीय तरुणाने केलेल्या आंदोलनामुळे चीन प्रशासनालाही धारेवर धरलं आहे. जोशुआ वॉग्न नावाच्या मुलगा चीनमधील कम्युनिस्ट पार्टीने लादलेल्या विधेयकाच्या विरोधात आंदोलन करत आहे. तो सर्व आंदोलनकर्त्यांच्या नेता बनला आहे. या विधेयकानुसार जर कोणत्याही व्यक्तीने किंवा सरकारने प्रशासनाविरोधात आंदोलन केले तर त्याला चीनमध्ये आणून खटला चालविला जाईल. या विधेयकाच्या विरोधात जोशुआने समर्थकांसोबत रस्त्यावर उतरुन आंदोलन सुरु केले आहे. विशेष बाब म्हणजे तरुणांचा सहभागाने प्रभावित झालेले आंदोलनकर्ते तेथील युवावर्गाचं प्रतिनिधित्व करत आहेत.

जोशुआ सोबत हॉंगकॉंगमधील लाखो लोकही रस्त्यावर उतरुन या विधेयकाचा निषेध करत आहेत. आंदोलनाचा परिणाम तेथील विमानसेवांवरही झाला आहे. मागील काही दिवसांपासून आंदोलनकर्त्यांनी हॉंगकॉंगच्या विमानतळावर कब्जा केला आहे. त्यामुळे एकाही विमानाला उड्डाण घेता आले नाही. एअर इंडियानेही हॉंगकॉंगला जाणाऱ्या सर्व फ्लाईट रद्द केल्या आहेत. तरुणांचा संघर्ष पाहता चीनसारखा देशही झुकल्याचे दिसत आहे. हॉंगकॉंगमधील तरुणांनी प्रशासनाने लादलेल्या या विधेयाकावर संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. तरुणांच्या संघर्षाने प्रशासनाने हे विधेयक मागे घेण्याचा निर्णय घेतला असला तरी आंदोनल थांबण्याची चिन्हे अद्यापतरी दिसत नाहीत.

जोशुओ हा तरुण हॉंगकॉंगमध्ये लोकशाही स्थापित करण्यासाठी उभारण्यात आलेल्या डेमोसिस्टो पक्षाचा महासचिव आहे. त्यापुर्वी त्यांने स्टुडंट ऑफ स्कॉलरिजमची स्थापना केली आहे. २०१४ मध्ये केलेल्या आंदोलनासाठी त्याला टाइम पत्रिकेने प्रभावी युवा म्हणुन गौरव केला आहे. तर २०१८ मध्ये नोबेल प्राईज मध्येही मानांकन करण्यात आले होते.

आरोग्यविषयक वृत्त –