सनातनवरील लक्ष हटविण्यासाठी विचारवंतांची धरपकड : राज ठाकरे

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन 

सनातनवरील कारवाईचे लक्ष हटविण्यासाठी एल्गार परिषदेतील डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येत आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. व्हिजन औरंगाबाद या कार्यक्रमासाठी औरंगाबाद शहरात राज ठाकरे आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’29dca9ac-ace7-11e8-becd-a18bbaca7ef7′]

मनसेच्या वतीने व्हिजन औरंगाबाद या कार्यक्रमाचे आयोजन रेल्वे स्टेशन रोडवरील हॉटेल विट्समध्ये करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी शहरातील वकील महासंघ, आयएमए, सीए असोसिएशन, सीएमआयए, मसिआ, क्रेडाई आदी संघटनांना निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात नाशिक शहराचा मनसेने कसा विकास केला, याबाबत चित्रफित दाखवण्यात आली.

निमंत्रितांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर राज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी शहराचा विकास घडवणे नागरिकांच्या हातात असून, आपल्याकडे काही नियोजन असून आगामी काळात आपण ते मांडणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणानंतर सनातन संस्थेवर बंदी आणण्याची मागणी करण्यात येत आहे.तसेच कोरेगाव भीमा प्रकरणाला आठ महिने झाल्यानंतर आताच या प्रकरणी कारवाई कशी काय सुरू झाली. ज्यांच्याकडे शस्त्रे सापडली त्यांच्यावर कारवाई होत असताना सत्ताधारी किंवा विरोधक त्यामध्ये हिंदू दहशतवाद तसेच मुस्लिम दहशतवाद असे म्हणत राजकारण का आणतात. सरकारने जर योग्य सरंक्षण दिले, तर नागरिक शस्त्र कशासाठी बाळगतील.

तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव घ्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुली आणि महिलांवरील वाढत्या अत्याचारांबाबत राज ठाकरे म्हणाले, राज्यातून मुलींना पळवण्याचे प्रमाण वाढले आहे. या मुलींना कोठे नेले जाते, त्यांचे काय होते हे समोर आलेले नाही. ज्यांच्या मुली बेपत्ता आहेत त्यांचे कुटुंब आपल्या मुलीचे काय झाले असेल, या विचाराने टाहो फोडत आहेत. यास शासन दोषी आहे. मराठा आंदोलनादरम्यान औरंबादच्या वाळुज एमआयडीसीत घडलेल्या हिंसेबाबत राज ठाकरे म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात नऊ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला होता. त्यावेळी औरंगाबाद येथील वाळूज एमआयडीसी परिसरात कंपन्यांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यामागे परप्रांतीय होते.