खासदार-आमदाराच्या शाब्दिक वादात महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्याची उडी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड शहरातील खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात महापालिकेतील कामावरून शाब्दिक वाद सुरु झाले आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु असताना यामध्ये महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी उडी मारली आहे.

[amazon_link asins=’B077PWBC7J,B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d9617381-ab6c-11e8-91a4-b5e3b7f34cb7′]

शहराच्या खासदार-आमदारांनी केंद्र, राज्य सरकारकडून निधी आणणे अपेक्षित आहे. परंतु, त्यांचे अधिक लक्ष्य पालिकेतच आहेत. दररोजच  खासदार, आमदार बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत. खासदार, आमदारांचे पालिकेत आर्थिक देणे-घेणे राहिले असेल असा आरोपही साने यांनी केला. तसेच पालिकेतच जीव घुटमळत असेल तर दोघांनी आपल्या पदाचे राजीनामे देऊन पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून यावे, असा उपरोधिक सल्लाही साने यांनी खासदार, आमदारांना दिला आहे.

खासदारांनी दिल्लीत लक्ष्य घालावे. आमदारांनी मुंबईत बघावे. शहरासाठी जास्तीत-जास्त निधी आणावा. पालिकेत लक्ष्य देण्याची गरज नाही. पालिकेतील नगरसेवक सक्षम आहेत. त्यामुळे खासदार, आमदारांनी लक्ष्य देण्याची आवश्यकता नाही. खासदार, आमदार वेगवेगळ्या बैठका घेऊन अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत. एक आमदार म्हणतात काम करायचे तर दुसरे म्हणतात करायचे नाही. त्यामुळे कोणतेच काम होत नाही.

खासदार, आमदारांचे पालिकेत काही आर्थिक देणे-घेणे राहिले असेल, पालिकेत जीव घुटमळत असेल तर त्यांनी पदाचे राजीनामे द्यावेत. नगरसेवक म्हणून निवडून यावे, असेही साने म्हणाले.